संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यासाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 06:46 PM2019-05-31T18:46:22+5:302019-05-31T18:46:59+5:30

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पंढरपूर पालखी मार्ग ज्या तालुक्यांतून जात असेल त्या मार्गाला प्रथम प्राधान्य देऊन पालखी मार्गातील प्रत्येक गावाच्या संबंधित ग्रामपंचायतीने मार्गाच्या दुतर्फा झाडे लावावी अशी सक्ती करावी, म्हणजे वारकऱ्यांना सावलीची व्यवस्था होईल, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष पंडित कोल्हे व सोहळाप्रमुख पुंडलिक थेटे यांनी केली.

Meeting for Sant Nivittinath Palkhi Festival | संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यासाठी बैठक

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देताना पंडित कोल्हे, पुंडलिक थेटे आदी

Next

नाशिक : संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पंढरपूर पालखी मार्ग ज्या तालुक्यांतून जात असेल त्या मार्गाला प्रथम प्राधान्य देऊन पालखी मार्गातील प्रत्येक गावाच्या संबंधित ग्रामपंचायतीने मार्गाच्या दुतर्फा झाडे लावावी अशी सक्ती करावी, म्हणजे वारकऱ्यांना सावलीची व्यवस्था होईल, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष पंडित कोल्हे व सोहळाप्रमुख पुंडलिक थेटे यांनी केली.
श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सोलापूर येथे बैठक झाली. बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भोसले यांनी सांगितले की, निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून, मागणीप्रमाणे रस्ता चौपदरीकरणाविषयी विशेष बैठक घेऊन सदर काम मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. कोल्हे यांनी सांगितले की, एका बाजूला शासन स्वच्छता अभियान, निर्मळ वारी यासारखे उपक्र म राबवत असताना पालखी सोबत मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय दिले तर निर्मळ वारी संकल्पना यशस्वी होईल. वारीसाठी प्रत्येक मुक्कामी अखंड वीजपुरवठा असावा.
म्हणजे पाण्याचे टँकर भरता येतील. बºयाच वेळेला विहिरीत पाणी असते; पण वीज नसते अशी अडचण होऊ नये यासाठी वीजपुरवठा द्यावा, तसेच गॅस-रॉकेलचा पुरवठादेखील अपुरा पडू नये. प्रत्येक वारकºयाचा अपघाती विमा शासनानेच सक्तीने काढून घ्यावा. निवृत्तिनाथ महाराज सोहळ्यासाठी दर्शनासाठी २०० पास द्यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Meeting for Sant Nivittinath Palkhi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.