भारीप बहुजन महासंघाचा कळवणला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 03:36 PM2018-11-10T15:36:27+5:302018-11-10T15:36:43+5:30

तालुकाध्यक्षपदी निकम : युवा तालुकाध्यक्षपदी गरुड

Meet the massacre of the Bahujan Mahasangh | भारीप बहुजन महासंघाचा कळवणला मेळावा

भारीप बहुजन महासंघाचा कळवणला मेळावा

googlenewsNext
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात वंचित बहुजनांना एकत्र करु न सत्तास्थानापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कळवण : सर्व समाजातील वंचितांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व शासनाकडील आपला न्याय हक्क व योजना मिळविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात बोलताना केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात वंचित बहुजनांना एकत्र करु न सत्तास्थानापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कळवण येथे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी सांगितले की, प्रत्येकाला घराबाहेर पडून जनमानसात आपली भूमिका पटवावी आहे, युवाशक्ती यासाठी खुप मोलाची ठरणार असून पक्ष मोठ्या जोमाने आपले यशस्वी प्रदर्शन येत्या काळात घडविणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक वामनराव गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष गौतम बागुल यांचीही यावेळी भाषणे झाली. मेळाव्यामध्ये तालुकाध्यक्षपदी प्रदिप निकम, शहराध्यक्षपदी राम बस्ते आणि युवा तालुकाध्यक्षपदी नरेंद्र गरु ड, युवा शहराध्यक्षपदी विश्वामित्र बस्ते, महिला तालुकाध्यक्षपदी सौ. शोभा आहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी भिवानंद काळे, विनायक काळदाते, अरु ण गायकवाड, ढेपले, ज्येष्ठ नेते शंकरराव काकळीज, दीपचंद दोंदे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्छाव, सम्राट पगारे, युवा जिल्हा महासचिव दिलीप लिंगायत, चेतन गांगुर्डे, प्रा. अमोल बच्छाव, बिपीन पटाईत, किरण खरे, विशाल खरे, संदिप वाघ, शेखर बच्छाव, बाळा जाधव, गणेश शार्दूल यांबरोबरोबच नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Meet the massacre of the Bahujan Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.