कोणार्कनगर परिसरातील आठवडे बाजार अद्यापही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:28 AM2018-05-20T00:28:49+5:302018-05-20T00:28:49+5:30

बारा वर्षांपूर्वी स्थानिक व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विक्र ी करता यावा या हेतूने कोणार्कनगर परिसरात मंगळवार, शुक्रवार आठवडे बाजार सुरू झाला. पुढे याच धर्तीवर पंचवटीतील निलगिरीबाग, हनुमाननगर, साईनगर, जत्रा हॉटेल अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी रोज आठवडे बाजार भरू लागला पण एका तक्र ारीच्या अनुषंगाने अचानक मनपा प्रशासनाने पुढील मंगळवारी कोणार्कनगर येथे भरणाºया आठवडे बाजारात सामील न होण्याची तंबी दिल्याने शेकडो कुटुंबाच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Market closes in Konkanagar area for weeks | कोणार्कनगर परिसरातील आठवडे बाजार अद्यापही बंद

कोणार्कनगर परिसरातील आठवडे बाजार अद्यापही बंद

googlenewsNext

आडगाव : बारा वर्षांपूर्वी स्थानिक व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विक्र ी करता यावा या हेतूने कोणार्कनगर परिसरात मंगळवार, शुक्रवार आठवडे बाजार सुरू झाला. पुढे याच धर्तीवर पंचवटीतील निलगिरीबाग, हनुमाननगर, साईनगर, जत्रा हॉटेल अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी रोज आठवडे बाजार भरू लागला पण एका तक्र ारीच्या अनुषंगाने अचानक मनपा प्रशासनाने पुढील मंगळवारी कोणार्कनगर येथे भरणाºया आठवडे बाजारात सामील न होण्याची तंबी दिल्याने शेकडो कुटुंबाच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार बंद न करता पर्यायी जागेवर स्थलांतर करावे व तोपर्यंत बाजार बंद करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  कॉलनी परिसरात सुरू झालेल्या आठवडे बाजारामध्ये आडगाव, विंचूर गवळी, लाखलगाव, नांदूर, मानूर, खेरवाडी, माडसांगवी, शिलापूर, सय्यद पिंपरी, म्हसरूळ पंचक्रोशीतील शेतकरी शेतमाल विक्र ीसाठी आणतात. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त आणि ताजा भाजीपाला उपलब्ध होतो तर शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळतो.  बाजार बंद होणार असल्यामुळे शेकडो कुटुंबांचे उपजीविकेचे साधन जाणार असून, उपासमारीची वेळ येणार आहे.  प्रशासनाने बाजार बंद न करता सोयीची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे पण या मागणीचा विचार न करता बाजार बंद निर्णय चुकीचा असल्याने जनआंदोलन उभारण्याचा इशारा काही शेतकºयांनी दिला आहे. आठवडे बाजार रस्त्यावर भरत असल्यामुळे काही तक्र ार असेल तर पर्याय न शोधता बाजार बंद करण्याचे सांगितले गेल्याने मनपा प्रशासनाच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Market closes in Konkanagar area for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार