अहिराणी साहित्य संमलेनात घुमला मराठमोळया भजनांचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 06:18 PM2017-12-29T18:18:52+5:302017-12-29T18:20:32+5:30

Marathamlaya Bhajanana alarm of Ahmani literature | अहिराणी साहित्य संमलेनात घुमला मराठमोळया भजनांचा गजर

अहिराणी साहित्य संमलेनात घुमला मराठमोळया भजनांचा गजर

Next
ठळक मुद्देरामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचेभक्तांसाठी केला उभा हा संसार

नाशिक : ‘रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे’, ‘अमृताची फळे अमृताची वेली तोचि पुढे चाली बीजाची ही’ , ‘भक्तांसाठी केला उभा हा संसार’, ‘हे तुझे भजना कसे करावे, अरे ठाऊक मजला नाही’ या आणि अशा विविध भजनांचे सादरीकरण शुक्रवारी (दि. २९) ठक्कर डोम येथे आयोजित खान्देश महोत्सवात करण्यात आले.
खान्देशी संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला व्हावी तसेच अहिराणी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या खान्देशी महोत्सवात शुक्रवारी महिलांसाठी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या भजन स्पर्धेसाठी १५ हून अधिक महिला भजनी मंडळांनी या स्पर्धेसाठी आपला उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला. भजनी मंडळांच्या सदस्यांनी लाल, पिवळा, राखाडी, पांढरी रंगांच्या एकसमान साड्या परिधान करुन भजनसत्राला अनोखे स्वरुप दिले होते. बहुतांश भजनी मंडळात गायकांसह वादकही महिलाच असल्याचे दिसून आले.
या स्पर्धेसाठी प्रत्येक गटाला एक अभंग किंवा एक गौळण १२ मिनीटांमध्ये सादर करायचे होते आणि सहभागी प्रत्येक मंडळाने या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत आपल्या अनोख्या शैैलीत एकाहून एक सरस अशा भजनांचे सादरीकरण केले. या भजन स्पर्धेसाठी आशिष रानडे आणि मृदुला देव यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

Web Title: Marathamlaya Bhajanana alarm of Ahmani literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.