सोयगाव कलेक्टरपट्टा भागातील उज्ज्वल प्राथमिक शाळेत वाळूवर रेखाटला जिल्ह्याचा नकाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:28 PM2018-02-13T23:28:42+5:302018-02-13T23:51:46+5:30

सोयगाव कलेक्टरपट्टा भागातील उज्ज्वल प्राथमिक शाळेत मैदानावर असलेल्या वाळूत विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्याचा नकाशा साकारला होता.

Map of the sketch district on the sand in the bright elementary school of Soegga collectorpatta | सोयगाव कलेक्टरपट्टा भागातील उज्ज्वल प्राथमिक शाळेत वाळूवर रेखाटला जिल्ह्याचा नकाशा

सोयगाव कलेक्टरपट्टा भागातील उज्ज्वल प्राथमिक शाळेत वाळूवर रेखाटला जिल्ह्याचा नकाशा

Next

मालेगाव : विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याच्या क्षेत्रफळासह सर्व तालुक्यांची ओळख व्हावी या हेतूने सोयगाव कलेक्टरपट्टा भागातील उज्ज्वल प्राथमिक शाळेत मैदानावर असलेल्या वाळूत विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्याचा नकाशा साकारला होता. विद्यार्थ्यांना नकाशा वाचनाचे अध्यापन करताना सुलभता व्हावी, या हेतूने ही संकल्पना राबविण्यात आली. नकाशात सर्व तालुक्यांची नावे लिहिली. यासह ‘स्वच्छ मालेगाव, सुंदर मालेगाव’ हा संदेश कार्यक्रमा-प्रसंगी विद्यार्थ्यांना देण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव रईस शेख, मुख्याध्यापक अर्चना गरुड, अमोल ठोके, योगेश बच्छाव, प्रवीण काकळीज, दिवेश बोरसे, गणेश पवार, स्वाती पाटील, स्वाती अहिरे, अर्चना पगार, संगीता गायकवाड आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Map of the sketch district on the sand in the bright elementary school of Soegga collectorpatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा