भुसावळ विभागाच्या अनेक रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:50 AM2019-02-12T00:50:54+5:302019-02-12T00:51:59+5:30

दक्षिण-पूर्व रेल्वे विभागात कामे करण्यासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात रद्द करण्यात आल्या आहेत.

Many trains of Bhusawal division canceled | भुसावळ विभागाच्या अनेक रेल्वेगाड्या रद्द

भुसावळ विभागाच्या अनेक रेल्वेगाड्या रद्द

Next

नाशिकरोड : दक्षिण-पूर्व रेल्वे विभागात कामे करण्यासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात रद्द करण्यात आल्या आहेत.
हावडा-मुंबई सुपर एक्स्प्रेस (१५ व २२ फेब्रुवारी), मुंबई-हावडा सुपर एक्स्प्रेस (१७ व २४ फेब्रुवारी), टाटा-एलटीटीटी अंत्योदया एक्स्प्रेस (१४, १७, २१, २४, २८ फेब्रुवारी), एलटीटी-टाटा एक्स्प्रेस (१२, १६, १९, २३, २६ फेब्रुवारी व २ मार्चला), संतराकाची-पुणे हमसफर एक्स्प्रेस १६, २३ फेब्रुवारी तसेच २, ९, १६, २३, ३० मार्चला रद्द आहे. पुणे-संतराकाची एक्स्प्रेस (१८, २५ फेब्रुवारी, ४, ११, १८, २५ मार्च व १ एप्रिल) रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Many trains of Bhusawal division canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.