शहरात लवकरच मनपातर्फे ई-लायब्ररी

By admin | Published: July 28, 2014 12:15 AM2014-07-28T00:15:13+5:302014-07-28T00:52:33+5:30

महापालिकेच्या वतीने शहरात लवकरच ई-लायब्ररी

Manpel e-libraries in the city soon | शहरात लवकरच मनपातर्फे ई-लायब्ररी

शहरात लवकरच मनपातर्फे ई-लायब्ररी

Next

नाशिकरोड : सध्या सर्वच क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. शहरातील नागरिकांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात लवकरच ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी केले.
प्रभाग ५९ बिटको महाविद्यालयामागील हांडे मळ्यातील मनपाची बंद असलेली अभ्यासिका पुन्हा सुरू करून नगरसेविका संगीता गायकवाड व शिखर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या प्रयत्नाने नुकतीच सुरू करण्यात आली. अभ्यासिकेत शिखर प्रतिष्ठानच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली, त्याप्रसंगी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनविसे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गिते, शिक्षण मंडळ सदस्य जय कोतवाल, मनविसे शहराध्यक्ष मुकेश शहाणे, मनसे विभागीय अध्यक्ष संतोष सहाणे, शरद गायकवाड, अजित पोकार आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिखर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी अभ्यासिकेत लवकरच संगणक व वायफाय सेवा सुरू करून देणार असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी संजय शर्मा, श्याम गोहाड, नितीन काकड, विक्रम दुनबळे, सतीश खैरनार, विनित पिंगळे, अतुल पटेल, रोशन आगळे, अक्षय
एखंडे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Manpel e-libraries in the city soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.