मंडळांना मंडप उभारणीस अखेर अनुमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:46 PM2018-09-09T23:46:07+5:302018-09-10T00:20:09+5:30

गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक महापालिकेकडून मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी आडकाठी केली जात असल्याने संतप्त झालेले गणेशभक्त रविवारी सकाळी रास्ता रोको करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर महापालिका नरमली.

The Mandal is finally allowed to build the tent | मंडळांना मंडप उभारणीस अखेर अनुमती

मंडळांना मंडप उभारणीस अखेर अनुमती

Next
ठळक मुद्देरास्ता रोको मागे गणेशोत्सवात आडकाठी करण्यास महापालिकेस मज्जाव

नाशिक : गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक महापालिकेकडून मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी आडकाठी केली जात असल्याने संतप्त झालेले गणेशभक्त रविवारी सकाळी रास्ता रोको करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर महापालिका नरमली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता सर्व गणेश मंडळांना जागेवरच अनुमती देण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दर्शविल्याने वादावर पडदा पडला असून, गणेशोत्सवावरील विघ्न टळल्याने भक्तांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.
शनिवारी सायंकाळनंतर महापालिका व गणेश मंडळांमध्ये वादाची ठिणगी पडली. घनकर गल्लीतील नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाचे कार्यकर्ते ‘नाशिकचा राजा’साठी मंडपाची उभारणी करीत असताना महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेरे यांनी तेथे येऊन रस्त्यावर मंडप उभारणीस मज्जाव केला. त्यावर मंडळाचे अध्यक्ष तथा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी त्यांना जाब विचारला असता, प्रकरण तू-तू मै-मै पर्यंत गेले. नेरे यांनी गणपती बसवू देणार नाही, अशी भूमिका घेत, जुन्या नाशकातील सुमारे दहा ते बारा गणेश मंडळांचे मंडपाचे अतिक्रमण हटविण्याची तयारी सुरू केली. त्यावर मंडळाचे कार्यकर्ते व महापालिकेच्या अधिकाºयांमध्ये वाद झडला. सदरचे प्रकरण सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोहचले. नितीन नेरे यांनी समीर शेटे यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना दिले, तर शेटे यांनीही नेरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला असता त्यावर पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत नाशकातील गणेश मंडळांपर्यंत हे वृत्त वाºयासारखे पसरताच रविवारी सकाळी १० वाजता प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
रविवारी सकाळी ९ वाजेपासूनच शहरातील गणेशभक्तांची घनकर लेनमध्ये जमवाजमव सुरू झाली. उत्सवाच्या तोंडावर शहरातील वातावरण खराब होऊ नये म्हणून पोलिसांनी पुन्हा मध्यस्थी केली व गणेश मंडळांना रस्त्यावर मंडप उभारणीस अनुमती देण्याची तयारी दर्शविली. यावेळी समीर शेटे, गजानन शेलार, देवांग जानी, सचिन डोंगरे, सत्यम खंडाळे, मनीष महाकाळे, किशोर गरड, रामसिंग बावरी, गणेश बर्वे आदींनी पोलिसांशी चर्चा केली. यावर लेखी परवानगीची मागणी करण्यात आल्यावर पोलीस व महापालिकेने मंडप उभारणीच लेखी परवानगी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर जमलेल्या गणेशभक्तांनी ढोल, ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.
बारा गणेश मंडळांवरील कारवाई टळली
घनकर लेन येथे मंडप उभारणीवरून वाद झाल्याने रविवार कारंजा, देवधर लेन, घनकर लेन, जुने नाशिक या गावाठाणातील गणेश मंडळांनी रस्त्यावर उभारलेले मंडप महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रविवारी पोलीस बंदोबस्तात काढण्याचे नियोजन केले होते. तथापि, सकाळीच गणेशभक्तांनी आंदोलनाची हाक दिल्याने महापालिका प्रशासन बॅकफुटावर जात कारवाई रद्द करण्याचे जाहीर केले. त्यामुळे रविवारी सर्वच गणेश मंडळांनी जोमाने कामास सुरुवात केली.

Web Title: The Mandal is finally allowed to build the tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.