मालेगावी शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 06:39 PM2018-11-22T18:39:59+5:302018-11-22T18:40:36+5:30

मालेगाव तालुक्यातील निमगाव, सोनजसह इतर गावांमध्ये चारा छावणी, पाणी टँकर व दुष्काळी उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी घंटानाद करीत धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी प्रांत व तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Malegaavi Shivsena's Ghantanad movement | मालेगावी शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

मालेगाव तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करताना शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी.

Next
ठळक मुद्देप्रांताना निवेदन: निमगावसह सोनज परिसरात दुष्काळी उपाययोजना राबविण्याची मागणी

मालेगाव : तालुक्यातील निमगाव, सोनजसह इतर गावांमध्ये चारा छावणी, पाणी टँकर व दुष्काळी उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी घंटानाद करीत धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी प्रांत व तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
राज्य शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. तालुक्यातील पशुधन चाºयाअभावी संकटात सापडले आहेत. बहुतांशी गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. गुरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, गुरांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन द्यावे. वाड्या व वस्त्यांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, शेतकºयांचे कर्ज माफ करावे, शेती पंपाचे थकीत बिल माफ करावे, राष्ट्रीयकृत बँकांनी नवीन पिक कर्ज द्यावे, भुईगव्हाण शिवारातील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी असल्याने या भागात २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा आदिंसह इतर मागण्यांप्रश्नी शिवसेनेचे नेते व माजी जि. प. अध्यक्ष मधुकर हिरे यांच्या नेतृत्वाखाली येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. दिवसभर घंटानाद आंदोलन सुरू होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात बाजार समितीचे संचालक बंडूकाका बच्छाव, निंबा हिरे, दिपक अहिरे, रामचंद्र पाटील, पंकज निकम, अशोक शेवाळे, बबन अमराळे, रामचंद्र पाटील, सोमनाथ शेलार, एकनाथ शेलार, दिलीप चौधरी, दुर्गादास नंदाळे, अरुण हिरे, संजय दुसाने, भगवान शेवाळे, रमेश अहिरे, रमेश शेवाळे, चिंतामण शेवाळे, गोकुळ सोनवणे, वाल्मिक शेलार, सुरेश सोनवणे, बापू जगताप, शिवाजी घुगे, अशोक पवार आदिंसह महिला, शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Malegaavi Shivsena's Ghantanad movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.