मखमलाबाद तलाठी कार्यालय कुलूपबंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:20 AM2018-09-29T00:20:59+5:302018-09-29T00:21:34+5:30

मखमलाबाद परिसरात शासनाने सुरू केलेले तलाठी कार्यालय अनेकदा कुलूपबंदच राहत असल्याने विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे.

 Makhamabad talathi office lockup? | मखमलाबाद तलाठी कार्यालय कुलूपबंद?

मखमलाबाद तलाठी कार्यालय कुलूपबंद?

googlenewsNext

पंचवटी : मखमलाबाद परिसरात शासनाने सुरू केलेले तलाठी कार्यालय अनेकदा कुलूपबंदच राहत असल्याने विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे.  सातबारा तसेच अन्य दाखल्यांसाठी परिसरातील नागरिकांना वारंवार मखमलाबाद येथील तलाठी कार्यालयात खेट्या घालाव्या लागत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी कार्यालय असून, नागरिक विविध दाखले काढण्यासाठी तसेच चौकशीकामी या कार्यालयात येत असतात, कार्यालयात क धी कर्मचारी उपस्थित असतात तर कधी कर्मचारीच नसतात. अनेकदा सकाळी अकरा वाजेनंतरही हे कार्यालय कुलूपबंदच असते त्यामुळे कार्यालय बंद आणि नागरिक कार्यालयाबाहेर उभे राहून कार्यालय उघडण्याची प्रतीक्षा करतात. वारंवार चकरा मारूनही कार्यालयातील काही कर्मचाºयांकडून दाखले कधी मिळणार याबाबत स्पष्ट माहिती तर दिली जात नाहीच शिवाय नागरिकांना चार ते पाच वेळा कार्यालयात चकरा मारायला लावतात. आज जिल्हाधिकारी कार्यालयात काम तर उद्या काय तहसीलदाराकडे काम अशाप्रकारची उत्तरे संबंधित कार्यालयातील कर्मचाºयांकडून दिली जात असल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. दाखल्यांसाठी मखमलाबादच्या तलाठी कार्यालयात चकरा मारूनही नागरिकांची कामे होत नसल्याने संबंधित विभागाच्या कर्मचाºयांवर कोणत्याही अधिकाºयाचा अंकुश नाही का? असा सवाल मखमलाबाद परिसरात राहणाºया नागरिकांनी केला आहे.

Web Title:  Makhamabad talathi office lockup?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.