महात्मा फुले यांच्या विचारांनी मिटेल अंधश्रद्धेचे मळभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:25 AM2018-04-14T00:25:13+5:302018-04-14T00:25:13+5:30

महात्मा जोतिराव फुले यांनी क्षुद्रातीक्षुद्र वर्गात शिक्षणाचा प्रसार करून तत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेच्या दरीत लोटला गेलेल्या समाजाला बाहेर काढून शिक्षित केले. परंतु, आजही समाजातील काही घटक पूजा, जप, अनुष्ठानमध्ये गुरफटलेला आहे. या समाज घटकांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरण करून शिक्षण घेतल्यास समाजातील अंधश्रद्धेचे मळभ पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास प्रा. जयवंत बागुल यांनी व्यक्त केला आहे.

Mahatma Phule's ideas Methil superstition | महात्मा फुले यांच्या विचारांनी मिटेल अंधश्रद्धेचे मळभ

महात्मा फुले यांच्या विचारांनी मिटेल अंधश्रद्धेचे मळभ

googlenewsNext

नाशिक : महात्मा जोतिराव फुले यांनी क्षुद्रातीक्षुद्र वर्गात शिक्षणाचा प्रसार करून तत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेच्या दरीत लोटला गेलेल्या समाजाला बाहेर काढून शिक्षित केले. परंतु, आजही समाजातील काही घटक पूजा, जप, अनुष्ठानमध्ये गुरफटलेला आहे. या समाज घटकांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरण करून शिक्षण घेतल्यास समाजातील अंधश्रद्धेचे मळभ पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास प्रा. जयवंत बागुल यांनी व्यक्त केला आहे. माळी समाज सेवा समितीतर्फे पंडित पलुस्कर सभागृहात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त महात्मा फुले विचार ज्ञानयज्ञ सोहळ्यात ‘महात्मा फुले व अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी नगरसेवक बाळासाहेब जानमाळी, मोना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. दौलतराव गांगुर्डे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अनिल कोठुळे, मीना समाजाचे राजकुमार जेफ, ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्तमराव तांबे, माळी समाज सेवा समिती अध्यक्ष विजय राऊत, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव, महिला समितीच्या अध्यक्ष मंगला माळी उपस्थित होते. प्रा. बागुल म्हणाले, पूर्वीच्या काळात बहुजन समाज शिक्षित नसल्याने विशिष्ट वर्गाकडून त्यांचे शोषण केले गेले. यातूनच अंधश्रद्धा फोफावल्याने समाजाची प्रगती खुंटल्याचे लक्षात आल्यानंतर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती करून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. सोबतच सर्वसामान्यांसाठी व महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग फुले दाम्पत्यांनी खुला केला. परंतु माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुरेश कापरे यांनी केले. उत्तमराव बडदे यांनी आभार मानले.

Web Title: Mahatma Phule's ideas Methil superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक