देवळाली कॅम्प परिसरातील घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:18 PM2018-10-09T17:18:35+5:302018-10-09T17:19:42+5:30

नाशिक : घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पच्या आनंदरोड येथे घडली आहे़

A lump of money in the house of Deolali Camp area | देवळाली कॅम्प परिसरातील घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

देवळाली कॅम्प परिसरातील घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्देघरफोडीचा गुन्हा दाखल

नाशिक : घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पच्या आनंदरोड येथे घडली आहे़

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कचरू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंदरोडवरील गॅस गोडाऊनच्या बाजूला असलेल्या मोहन मनवाणी यांच्या बंगल्यावर ते राहतात. रविवारी (दि़७) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कुलूप लावलेली कडी तोडून घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील ५० हजार रुपये रोख, १८ हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत असा ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़  याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

नाशिकरोडला विवाहितेचा छळ
नाशिक : भाजी करता येत नाही, घरातील कामे व्यवस्थित करता येत नाही, आई-वडिलांनी विवाहात मोठ्या वस्तू दिल्या नाहीत, तसेच मुलांना शाळेत टाकण्यासाठी माहेरून पैसे आण या कारणावरून पतीसह सासरकडील मंडळी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची तक्रार विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़ विवाहितेच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी पती स्वप्नील शांताराम ताजणे, नंदिनी शांताराम ताजणे (सासू), पल्लवी रवि गिते (नणंद, सर्व राहणार पाडूरंग निवास, सौभाग्यनगर, नाशिकरोड) याच्याविरोधात विवाहिता छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़


सिडकोत एकावर वार
नाशिक : भावास मारहाण का केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकास दोघा संशयितांनी बेदम मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना रविवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास सिडकोतील पंडितनगर नाल्याजवळ घडली़ छकुल्या गायकवाड व अनिल मोरे असे मारहाण करणाऱ्या संशयिताचे नाव आहे़ याप्रकरणी अक्षय साळवे या युवकाच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे़


कारमधून तलवार जप्त
नाशिक : सिडकोतील लेखानगर बसथांब्यासमोर उभ्या असलेल्या डिझायर कारच्या डिक्कीतून (एमएच १५ ईबी ३५५५) अंबड पोलिसांनी सोमवारी (दि़८) दुपारी अडीच फुटाची तलवार जप्त केली़ याप्रकरणी कारचालक सचिन कारभारी थापेकर (रा़ गौळाणेनगर, नाशिक) विरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजले नसून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़


नाशिकरोडला तरुणाची आत्महत्या
नाशिक : घरातील सिलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास नाशिक-पुणे रोडवरील शिवाजीनगरमध्ये घडली़ अक्षय रमेश फड (२५, रा़ साई अपार्टमेंट, दत्तमंदिर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़


अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : भारतनगर परिसरातील अल्पवयीन मुलीचे वडाळागावातून अपहरण करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी अपहृत मुलीच्या काकाच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: A lump of money in the house of Deolali Camp area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.