किमान तपमान ९.६ : पारा सातत्याने घटतोय; आरोग्याची घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:08 PM2018-12-12T14:08:04+5:302018-12-12T14:10:23+5:30

संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा जाणवण्यास सुरूवात होते तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात थंडी जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे.

Lowest temperature 9.4: Mercury is continuously decreasing; Take care of healthcare | किमान तपमान ९.६ : पारा सातत्याने घटतोय; आरोग्याची घ्या काळजी

किमान तपमान ९.६ : पारा सातत्याने घटतोय; आरोग्याची घ्या काळजी

Next
ठळक मुद्दे मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी सर्वाधिक नीचांकी ७.६ अंशयावर्षी थंडीचा जोर अधिक बुधवारी ९.६ इतके किमान तपमान नोंदविले

नाशिक : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी मंगळवारी (दि.११) ९.४अंश इतके नोंदविले गेले. आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरिक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तपमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्याती सर्वाधिक कमी ८.८ अंश इतक्या किमान तपमानाची नोंद झाली. त्यामुळे थंडीच्या वाढत्या कडाक्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. शहरात किमान तपमान १२.८ तर कमाल तपमानाचा पारा थेट २८.२ अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे. मागील काही दिवसांपासून किमान तपमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीची तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. गेल्या शनिवारी (दि.१) शहरात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवला. त्यादिवशी कमाल तपमानाचा पारा २६.१ अंशापर्यंत तर कि मान तपमान ११.२ अंशापर्यंत घसरला होता; मात्र मंगळवारपासून किमान तपमानाचा पारा त्यापेक्षाही अधिक खाली घसरू लागल्याने थंडीने शहर गारठले आहे. मंगळवारी ९.४, बुधवारी ९.६ इतके किमान तपमान नोंदविले गेले.

एकूणच थंडीचा कडाका वाढताच नाशिककरांनी उबदार कपड्यांच्या वापरावर भर देण्यास सुरूवात केली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक चहा, कॉफीला पसंती देत आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा जाणवण्यास सुरूवात होते तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात थंडी जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. किमान तपमानाचा पारा कमी झाल्यामुळे कमाल तपमानदेखील तीशीच्या खाली सरकले आहे. मुंबईच्या हवामान खात्याने दोन दिवस नाशिकमध्ये थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या हंगामात ९.२ ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली आहे.

गतवर्षापेक्षा यंदा थंडीचा जोर अधिक
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा जोर अधिक असल्याचे हवामान खात्याकडील नोंदींवरून स्पष्ट होते. यांदा पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र अधिक असल्याचे जाणवत आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ९, १०, ११, १२ या तारखांना अनुक्रमे किमान तपमान १५.२ / १५.४ / १४.०० / १३.२ अंश इतके नोंदविले गेले होते. मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी सर्वाधिक नीचांकी ७.६ अंशापर्यंत किमान तपमानाची नोंद झाली होती. यावर्षी या तारखांना अनुक्रमे ११.३ / १२.८ / ९.४ / ९.६ इतके किमान तपमान नोंदविले गेले आहे.

महत्त्वाच्या शहरांमधील किमान तपमान असे...
पुणे : ९.५
अहमदनगर ९.२
जळगाव १०.४
महाबळेश्वर १३.५
मालेगाव १२.२
नाशिक : ९.६
सातारा : ९.४
औरंगाबाद १०.४
अकोला : १३.५

Web Title: Lowest temperature 9.4: Mercury is continuously decreasing; Take care of healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.