कमी दाबाने मिळतेय आवर्तनाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:41 PM2019-03-19T18:41:15+5:302019-03-19T18:41:38+5:30

मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.

Low water pressure | कमी दाबाने मिळतेय आवर्तनाचे पाणी

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाटोदा येथील साठवण तलावात कमी दाबाने येत असलेले आवर्तणाचे पाणी

Next
ठळक मुद्देपाणी टंचाई :मनमाडकरांचा दुष्काळात तेरावा महिना !

मनमाड: मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. सव्वा लाख लोकसंखेच्या मनमाड शहराची तहान भागवणारा पाटोदा साठवणूक तलाव पुर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
मनमाड शहरासाठी पालखेड धरणाच्या पाण्याचे आवर्तन १ मार्च रोजी सोडले जाणार होते.मात्र काही तांत्रीक अडचणींमुळे हा कालावधी लांबत जाउन पिण्याच्या पाण्याचे रोटेशन दहा ते बारा दिवस उशीराने सोडण्यात आले .पालखेड धरणातून कॅनाल द्वारे निघालेले पाणी गुरूवारी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाटोदा येथील साठवण तलावात आवर्तण सोडल्यानंतर तब्बल पाच दिवसांच्या विलंबाने पोहचले.मात्र हे पाणी पुर्ण क्षमतेने व पुर्ण दाबाने पोहचत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.पाटबंधारे प्रशासनाने चार पंपाचे पाणी सुरू ठेवावे आणि पाटोदा साठवणुक तलाव भरून द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी दिला आहे.शहराची गंभीर पाणी टंचाई लक्षात घेता ४० द.ल.घ.फु. पाणी मिळणे अपेक्षीत आहे.हे पाणी पुढील रोटेशन मिळेपर्यंत म्हणजे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.पालीकेच्या शिष्टमंळडळाने पाटोदा साठवण तलावावर भेट देउन पहाणी केली. या वेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते अलताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे,विजय मिश्रा, गालीब शेख, पापा थॉमस, बब्बू कुरेशी,स्वराज देशमुख आदी उपस्थित होते.
पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाडकरांना गेल्या काही महिन्यांपुर्वी दहा ते बारा दिवसाआड होणाºया पाणी पुरवठ्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या पाणीपुरवठ्याच्या दिवसांमधे वाढ होत जाउन तो कालावधी आज २० दिवसांच्या वर जाउन पोहचला आहे. त्यातच आवर्तण सुटण्यास झालेला विलंब व आता कमी दाबाने मिळणारे आवर्तणाचे पाणी या मुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Low water pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.