हृदयद्रावक घटनेनंतरही चिमुकल्या प्रेमचे अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:54 AM2019-06-29T00:54:07+5:302019-06-29T00:54:27+5:30

हृदयद्रावक हा शब्ददेखील अपुरा ठरावा, इतकी करुण दुर्दैवी घटना नाशिक-पंढरपूर सायकलवारीतील सायकलपटूंना शुक्रवारी (दि.२८) प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावी लागली. अवघ्या नऊ वर्षांचा असल्याने सर्वच सायकलपटूंच्या कुतुहलाचा केंद्रबिंदू असलेल्या लाडक्या ‘प्रेम’चा झालेला अपघात आणि त्याच्या पालकांनी फोडलेला हंबरडा बघून प्रत्येकाच्याच जिवाचा थरकाप उडाला.

 Love limb even after heartbreak | हृदयद्रावक घटनेनंतरही चिमुकल्या प्रेमचे अवयवदान

हृदयद्रावक घटनेनंतरही चिमुकल्या प्रेमचे अवयवदान

googlenewsNext

नाशिक : हृदयद्रावक हा शब्ददेखील अपुरा ठरावा, इतकी करुण दुर्दैवी घटना नाशिक-पंढरपूर सायकलवारीतील सायकलपटूंना शुक्रवारी (दि.२८) प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावी लागली. अवघ्या नऊ वर्षांचा असल्याने सर्वच सायकलपटूंच्या कुतुहलाचा केंद्रबिंदू असलेल्या लाडक्या ‘प्रेम’चा झालेला अपघात आणि त्याच्या पालकांनी फोडलेला हंबरडा बघून प्रत्येकाच्याच जिवाचा थरकाप उडाला. या घटनेनंतर काही तासांत स्वत:ला सावरत वडील सचिन निफाडे आणि कुटुंबीयांनी मिळून प्रेमच्या डोळ्यांसह त्वचादान करण्याचा दाखविलेला धीरोदात्तपणा सामाजिक बांधिलकीतील आदर्शाचा परमोच्च बिंदू ठरावा असाच होता.
नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकलवारीत सहभागी झालेल्या नाशिकरोड येथील प्रेम निफाडे या नऊ वर्षीय सायकलिस्टचा ट्रकच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. प्रचंड उत्साही, निरागस, मनमिळावू अशा या बालकाचा करुण अंत हा हृदय हेलावून टाकणाराच होता. या घटनेनंतर कोणीही कोलमडून पडेल परंतु, अशा स्थितीतही कुटुंबीयांनी आपल्यातील संवेदनशीलता जपत सामाजिक भानही दाखवून दिले. सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर तत्काळ निफाडे कुटुंबीय सिन्नरच्या सार्वजनिक रुग्णालयात जमले. या धक्क्यातून सावरत वडील सचिन आणि अन्य कुटुंबीयांनी प्रेमचे शाबूत असलेले सर्व अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने डोळे आणि त्वचेचे दान करण्यात आले; मात्र तांत्रिक विलंबामुळे किडनी, लिव्हर दान करणे शक्य झाले नाही.
सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
या घटनेने अनेक प्रश्नदेखील निर्माण केले आहेत. पंढरपूरची सायकलवारी ही संकल्पना अत्यंत चांगली असल्यानेच नाशिकच्या सायकलप्रेमींमध्ये ती झटकन रुजली होती. २०१२ साली केवळ ११ सायकलपटूंपासून प्रारंभ झालेल्या या सायकलवारीत वर्षागणिक वाढ होऊन ती संख्या यंदा ७०० पर्यंत पोहोचली होती; मात्र या घटनेमुळे या सायकलवारीच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित केली जाणारी भीती रास्तच ठरली. तसेच या घटनेतून बोध घेत भविष्यात निदान बालकांना तरी अशा जीवघेण्या साहसयात्रांमध्ये सहभागी करून घेऊ नये, हेच अधोरेखित झाले.
वर्षभरापासून पूर्वतयारी
४मागील वर्षीच प्रेम हा वारीत सहभागासाठी वडिलांच्या मागे लागला होता. अखेरीस यंदा या वारीत सहभागी होण्यास परवानगी मिळाल्याने तो उत्साहात होता. त्यामुळे महिनाभर आधीपासूनच वडिलांबरोबर सरावदेखील प्रेमने केला होता.
तिसऱ्या सायकलपटूचा अंत
४सायकलिस्ट संघटनेच्या पेलेटॉन स्पर्धेत नाशिकचे उद्योजक दिलीप बोरोवके यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता, तर संघटना ज्यांनी खºया अर्थाने नावारूपाला आणली, त्या संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष जसपालसिंग यांचादेखील ऐन तारुण्यात हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रेमचा अपघाती मृत्यू हा तर सर्वाधिक धक्कादायक आणि हृदयद्रावक ठरला.

Web Title:  Love limb even after heartbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.