शेतमाल पेटवून नुकसान; महिलेस रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:42 AM2018-01-30T00:42:47+5:302018-01-30T00:42:47+5:30

शेतकºयांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणाºया महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदूबाई शंकर मोराडे (रा. म्हसरूळ शिवार) असे शेतमालाचे नुकसान करणाºया संशयित महिलेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे़

 Loss of commodities; The women caught fire | शेतमाल पेटवून नुकसान; महिलेस रंगेहाथ पकडले

शेतमाल पेटवून नुकसान; महिलेस रंगेहाथ पकडले

Next

नाशिक : शेतकºयांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणाºया महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदूबाई शंकर मोराडे (रा. म्हसरूळ शिवार) असे शेतमालाचे नुकसान करणाºया संशयित महिलेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे़  मुकुंद सूर्यवंशी यांचे म्हसरूळ शिवारातील रासबिहारी लिंकरोडवर सर्व्हे नंबर १३९, १४० व १४२ येथे शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पाळीव जनावरांसाठी भुईमुगाचा पाला व गवत रचून ठेवलेले होते़ रविवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास ते आपल्या पत्नीसह भाजीपाला विक्री करून घरी परतत होते़ त्यांना शेतात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एक महिला पळताना दिसली़ त्यांनी प्रथम आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर पाठलाग करून पकडले असता ती इंदूबाई मोराडे असल्याचे समोर आले़ सूर्यवंशी यांनी तत्काळ सदर महिलेस म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देत फिर्याद दिली़  गत दीड वर्षापासून म्हसरूळ शिवारातील सुमारे सतरा शेतकºयांचे तयार झालेली गहू, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, भोपळे, टमाटे ही पिके तसेच जनावरांसाठी शेतात रचून ठेवलेले गवत, जनावरांचे शेड व घरास आग लावून पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत़ याबाबत शेतकºयांनी  वारंवार तक्रारी देऊनही संशयितास पकडण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले नव्हते़
अजब सल्ले 
सूर्यवंशी यांच्या शेतातील पाच एकर सोयाबीन ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाळण्यात आले आहे़ त्यावेळी शेतातील कामगाराने एका महिलेला पळताना बघितलेही मात्र तिला पकडण्यात यश आले नव्हते़ या घटनेनंतर म्हसरूळ ग्रामस्थांनी मारुती मंदिरासमोर घेतलेल्या ग्रामसभेत म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकाºयांना बोलावले असता शेतात सीसीटीव्ही कॅमरे बसवा, वॉचमन ठेवा, हॅलोजन लावा, चोरट्यांना रंगेहाथ पकडून आमच्या ताब्यात द्या, असे अजब सल्ले देण्यात आले होते़

Web Title:  Loss of commodities; The women caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक