कांदा चाळीत युरिया टाकल्याने लोहोणेरला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 07:00 PM2019-06-18T19:00:41+5:302019-06-18T19:00:59+5:30

लोहोणेर : येथील शेतकरी प्रवीण अहिरे व पोर्णिमा अहिरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९०८ मधील शेतातील कांदा चाळीत कोणीतरी रासायनिक युरिया टाकल्यामुळे सदरचे शेतकरी दापत्य हवालदिल झाले आहे . याप्रकरणी देवळा पोलिसात अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Lohonar has been booked for throwing urea onion chawl | कांदा चाळीत युरिया टाकल्याने लोहोणेरला गुन्हा दाखल

कांदा चाळीत युरिया टाकल्याने लोहोणेरला गुन्हा दाखल

Next

प्रवीण अहिरे हे काल दीपक देशमुख या मित्रासोबत शेतात गेले असता कांदा चाळीकडे लक्ष गेल्यावर चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक युरिया टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लोहोणेर येथील पोलीस पाटील अरु ण उशिरे यांना बोलावून घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पौर्णिमा अहिरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अहिरे यांचे वसाका रस्त्यालगत गट क्रमांक ९०८ मध्ये ५५ बाय ५५ आकाराचे मोठे पत्र्याचे शेड असून यात दोन पाखी कांद्याची चाळ आहे. या चाळीत सुमारे ७०० ते ८०० क्विंटल कांद्याची साठवणूक करण्यात आली आहे. आजच्या बाजारभावानुसार सुमारे नऊ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे.
सदर प्रकरणाची कृषी विभागाने दखल घेऊन कृषी सहायक वैशाली पवार यांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खंडेराव रदवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.

Web Title:  Lohonar has been booked for throwing urea onion chawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.