नाशिक : त्र्यंबकेश्वरला धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या इसमाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़
निवृत्ती केदू बत्तीशे (५४, रा. सैनिक विहार सोसायटी, नानेगावरोड, रेणुकानगर, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते ७ ते १० या कालावधीत त्र्यंबकेश्वरला धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते़
या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ६१ हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम सोन्याचे दागिने (बांगड्या, नथ, गोफ, मनी) चोरून नेले़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.