कर्जमाफी योजना : सहा हजार शेतकºयांना लाभ; कळवण तालुक्यातील स्थिती ३७ कोटींंचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:03 AM2017-12-13T01:03:49+5:302017-12-13T01:04:09+5:30

कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रु पयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली.

Loan Approval Scheme: 6,000 farmers benefit; 37 crore loan waived in Kalwan taluka | कर्जमाफी योजना : सहा हजार शेतकºयांना लाभ; कळवण तालुक्यातील स्थिती ३७ कोटींंचे कर्ज माफ

कर्जमाफी योजना : सहा हजार शेतकºयांना लाभ; कळवण तालुक्यातील स्थिती ३७ कोटींंचे कर्ज माफ

Next

कळवण : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रु पयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली. शासनाकडून कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासद शेतकºयांची ग्रीन लिस्ट प्राप्त झाली आहे. त्यात कळवण तालुक्यातील १ लाख ५० हजार रु पयांच्या आतील ३ हजार ६६० शेतकºयांना पूर्ण कर्ज माफीचा लाभ मिळाला असून त्यांची कर्जाची एकूण रक्कम २१ कोटी ७४ लाख ८१ हजार १७ रु पये आहे. सदर रक्कम जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेत कर्जदार सभासदाच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित दीड लाखांवर कर्ज असलेल्या १ हजार ७१९ शेतकºयांसाठी १४ कोटी ४४ लाख ४६ हजार रु पये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत; मात्र संबंधित कर्जदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी दीड लाखांच्यावरील रक्कम ३१ मार्च २०१८ पर्यंत भरणे आवश्यक आहे. या शिवाय कळवण तालुक्यातील नियमित कर्जदार असलेल्या ५९० कर्जदार शेतकºयांसाठीदेखील प्रोत्साहन रक्कम म्हणून १ कोटी ५ लाख ३८ हजार रु पये मंजूर झाले आहेत तालुक्यातील १ लाख ५० हजार रु पयांवरील कर्जदार असलेल्या शेतकºयांनी आपली रक्कम लवकरात लवकर जिल्हा बॅँकेच्या शाखेत भरून पूर्ण शासनाच्या कर्ज माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅक संचालक धनंजय पवार व बँकेचे विभागीय अधिकारी जयवंत बोरसे यांनी केले. कर्जमाफी योजनेंतर्गत कळवण तालुक्यातील बहुतांशी कुटुंबातील शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतकºयांची संपूर्ण आॅनलाइन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राष्ट्रीयीकृत बँकांनीदेखील शेतकºयांची माहिती आॅनलाइन भरली होती. कुठेच मंजूर यादी पाहायला उपलब्ध नसल्याने कर्जदार शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर कर्जमाफीबाबत कुठलीच माहिती दिली जात नाही, सर्व याद्या वरिष्ठ कार्यालयाकडून येणार असल्याचे उत्तर शेतकºयांना मिळत आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेतकºयांतून उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ज्या बँकांना पात्र शेतकºयांसाठी कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. ती किती शेतकºयांच्या खात्यावर वर्ग झाली. यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकºयांची संख्या किती आहे, याची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Loan Approval Scheme: 6,000 farmers benefit; 37 crore loan waived in Kalwan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी