जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील खड्यांमुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 08:37 PM2019-07-23T20:37:06+5:302019-07-23T20:38:30+5:30

इगतपुरी : शहरात गेल्या तीन वर्षापुर्वी १४ कोटी रूपये खर्च करून शासनाने सिमेंट काँक्र ीटीकरण केलेल्या जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसल्याने शहरातील व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

The lives of the villagers on the old Mumbai Agra highway were disrupted | जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील खड्यांमुळे जनजीवन विस्कळीत

इगतपुरी शहरातील मध्यवर्ती ठीकाणी रास्ता रोको करतांना अखिल भारतीय आदीवासी सेनेचे दि. ना. उघाडे व कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देइगतपुरी : शासनाच्या निषेर्धात अखिल भारतीय आदिवासी सेनेचा रास्ता रोको

इगतपुरी : शहरात गेल्या तीन वर्षापुर्वी १४ कोटी रूपये खर्च करून शासनाने सिमेंट काँक्र ीटीकरण केलेल्या जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसल्याने शहरातील व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांनी अनेक तक्र ारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने मंगळवारी (दि.२३) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी नायब तहसिलदार राजेंद्र कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एम. यु. मोरे यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील जुन्या मुंबई आग्रा महामार्गाचे काम सुरवातीपासुनच निकृष्ठ दर्जाचे झाल्याने या संपुर्ण रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेकदा बांधकाम विभागकडे निवेदने देवुन सुद्धा खड्डे बुजविले गेले नाहीत. मागील वर्षी खड्डे बुजविण्यासाठी आठ लाख रु पयेचा निधी वापरला. मात्र वरवर खड्यात माती टाकल्याने आज हे खड्डे पुन्हा उखडलेले आहेत.
महामार्गावरील सदरे खड्डे त्वरीत बुजविण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे, तालुका प्रमुख बाळासाहेब हासे, शहर संघटक प्रमुख गोकुळ हिलम, एकनाथ मुकणे, रमेश भोये, महिला आघाडी प्रमुख अनुसया आगीवले, मंगा आगीवले, सोमा आगीवले, शिवाजी वाघ, अरूण भडांगे, संकेत निकाळे, दिलीप मेंद्रे, किशोर मुर्तडक, बाळासाहेब बोंडे आदी उपस्थित होते.
@ प्रतिक्र ीया : -
इगतपुरीतील जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर पडलेल्या खड्यांबाबत वरिष्ठांना कळवले आहे. नवीन रस्ता बनविण्यासाठी एक कोटी रु पयांचा प्रस्तावही पाठवण्यात आला असुन तो पर्यंत पडलेल्या खड्यांत खडी व विटांचे तुकडे टाकुन खड्डे बुजविण्याचे काम लगेचच सुरु करण्यात आले आहे.
- मुकुंद मोरे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

 

Web Title: The lives of the villagers on the old Mumbai Agra highway were disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.