वनविभागाकडून जीवदान : नाशिकमध्ये विहिरीत पुन्हा कोसळला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 07:02 PM2018-07-19T19:02:31+5:302018-07-19T19:04:07+5:30

सावजच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला हा बिबट्या रात्रभर विहिरीच्या कपारीला बसून होता

Lived by forest department: In a well-drained leopard again in the well in Nashik | वनविभागाकडून जीवदान : नाशिकमध्ये विहिरीत पुन्हा कोसळला बिबट्या

वनविभागाकडून जीवदान : नाशिकमध्ये विहिरीत पुन्हा कोसळला बिबट्या

googlenewsNext
ठळक मुद्देक्रेनच्या साह्याने पिंजरा विहिरीबाहेर काढण्यात आला मादी बिबट्या सव्वा वर्षाचा आहे

नाशिक : निफाड तालुक्यातील कोठुरे येथे विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश आले आहे कोठुरे येथील ज्ञानेश्वर निखाडे यांच्या शेत गट नं 353 मध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला हा बिबट्या रात्रभर विहिरीच्या कपारीला बसून होता ही घटना सकाळी शेतकरी ज्ञानेश्वर निखाडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला कळविले येवला वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी , वनरक्षक विजय टेकणर , वनरक्षक राजेंद्र नागपुरे , वनसेवक भैय्या शेख, रामचंद्र गंडे ,कचरू अहेर ,कृष्णा खळे , विलास देशमुख , सुनील भामरे ,गनिभाई शेख ,रामनाथ भोरकडे , आदींचे पथक कोठुरे येथे पोहचले विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती या पथकाने वन विभागाच्या क्रेणच्या साहाय्याने पिंजरा ज्या कपारीत बिबट्या विहिरीत कपरीला बसलेला होता त्या कपारीपर्यंत सोडला काही वेळानंतर या बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर क्रेनच्या साह्याने पिंजरा विहिरीबाहेर काढण्यात आला आणि बिबट्याला निफाडला वनविभागाच्या नर्सरीत आणले असता पशुवैधकीय आधिकारी डॉ चांदोरे यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली हा मादी बिबट्या सव्वा वर्षाचा आहे

 

 

Web Title: Lived by forest department: In a well-drained leopard again in the well in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.