मनमाड शहरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:55 AM2019-03-07T00:55:24+5:302019-03-07T00:55:54+5:30

मनमाड : शहरात गेल्या दीड महिन्यांपासून विजेचा सुरू असलेला लपंडाव व ऐन सणाच्या दिवशी यात्रोेत्सव काळात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या मनमाडकर नागरिकांनी वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

Lightning hide in the city of Manmad | मनमाड शहरात विजेचा लपंडाव

मनमाड शहरात विजेचा लपंडाव

Next
ठळक मुद्दे अभियंत्यास पुष्पगुच्छ : संतप्त नागरिकांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन


ंमनमाड वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.बी. शिंदे यांचा गांधीगिरी मार्गाने सत्कार करताना वीजग्राहक संघर्ष समितीचे संतोष बळीद, नितीन पांडे, नारायण पवार, कैलास पाटील, राजेंद्र ताथेड, जयकुमार फुलवाणी, संजोग बरडिया आदी.
 

मनमाड : शहरात गेल्या दीड महिन्यांपासून विजेचा सुरू असलेला लपंडाव व ऐन सणाच्या दिवशी यात्रोेत्सव काळात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या मनमाडकर नागरिकांनी वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.
नुकत्याच झालेल्या महाशिवरात्री सणाच्या दिवशी दत्तमंदिर परिसरात असणाऱ्या संगमेश्वर व पाताळेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या सार्वजनिक यात्रोत्सवात दुपारी ३ वाजेपासून ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे यात्रोत्सव काळात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेषत: महिलावर्ग, वयोवृद्ध व लहान मुले यांना या अंधारात यात्रेचा आनंद घेता आला नाही.
महावितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराबद्दल नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी
वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. बी. शिंदे यांना गांधीगिरी पद्धतीने फुलांचा गुच्छ देऊन आंदोलन केले.
यावेळी वीजग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष बळीद, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा चिटणीस नारायण पवार, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते नगरसेवक कैलास पाटील, राजेंद्र ताथेड, संजोग बरडिया, आशिष घुगे, बाळासाहेब सुपेकर, साजीद शेख, नितीन परदेशी, दादाभाई परदेशी, विक्की सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उपकार्यकारी अभियंता एस.बी. शिंदे व इतर अधिकारी मनमाड शहरात उत्सव काळात हजर राहत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Lightning hide in the city of Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज