दारणा, मुकणे धरणातून मराठवाड्याठी शेवटचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 01:08 PM2019-05-13T13:08:59+5:302019-05-13T13:09:44+5:30

नांदूरवैद्य : नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाअंतर्गत असलेल्या गंगापूर धरण समूहातील दारणा, मुकणे धरणांतून मराठवाडा व नगर जिल्ह्यांसाठी शेवटचे आवर्तन सोडले आहे.

The last recurrence of the Darna, Mukta dam from Maratha | दारणा, मुकणे धरणातून मराठवाड्याठी शेवटचे आवर्तन

दारणा, मुकणे धरणातून मराठवाड्याठी शेवटचे आवर्तन

Next

नांदूरवैद्य : नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाअंतर्गत असलेल्या गंगापूर धरण समूहातील दारणा, मुकणे धरणांतून मराठवाडा व नगर जिल्ह्यांसाठी शेवटचे आवर्तन सोडले आहे. पाण्याचा विसर्ग २९०० क्यूसेस असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी पोहचेल. इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये एकूण केवळ १८ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला असतांना उशिरा का होईना पाटबंधारे विभाग प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.  मुकणे, दारणा, वालदेवी, कडवा धरणांतून २ हजार १०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात येणार आहे. दुष्काळात सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे दारणा काठच्या भागातील गावांनाही याचा दिलासा मिळाला आहे. हे पाणी दारणा धरणातून नदीमार्गे नांदूरमध्यमेश्वरच्या डाव्या व उजव्या कालव्यातून वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहत्याला सोडण्यात आले आहे. पाणी वाया न जाता संबंधित गावांपर्यंत पोहोचावे अवैध उपसा होवू नये याबाबत पुरेपुर काळजी घेण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आगामी पंधरा दिवस वहन मार्गावर रोज २२ तास थ्रीफेज वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.दारणा व मुकणे नदीचे पाणी आटल्याने पंधरा दिवसांपासून अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या.या योजनांना पुनरु ज्जीवन मिळाल्याने गावांना दिलासा मिळाला आहे. दारणा व मुकणे धरणाचे पाणी संयुक्तरित्या औरंगाबाद, वैजापूर, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी, राहता या शहरांची तहान भागविणार आहे.

Web Title: The last recurrence of the Darna, Mukta dam from Maratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक