ठळक मुद्देबागायती जमीनच समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदी संघर्ष समितीला मोठा धक्का ४८७ शेतकºयांना २३८ कोटीहून अधिक रक्कम

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाºया शेतकरी संघर्ष समितीच्या इगतपुरी तालुका अध्यक्षानेच त्याची आई व मुलाच्या नावे असलेली बागायती जमीनच समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने शासनाला विक्री केली असून, समृद्धीविरोधी भूमिका घेणाºया संघर्ष समितीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
समृद्धी महामार्गाला जागामालक शेतकºयांचा होणारा विरोध हळूहळू कमी होत चालला असून, १६ नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने २०४ हेक्टर जमीन थेट खरेदीने ताब्यात घेतली आहे. त्यात सर्वाधिक विरोध करणाºया सिन्नर तालुक्यातील १४० हेक्टर, तर इगतपुरी तालुक्यातील ६४ हेक्टर जागेचा समावेश असून, या जागेच्या मोबदल्यापोटी ४८७ शेतकºयांना २३८ कोटीहून अधिक रक्कम त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. शासनाने जमिनीच्या मोबदल्यासाठी पाचपट भाव दिल्यामुळे शेतकरी जागा देण्यास तयार होत असून, त्यात प्रशासनातील अधिकारीही त्यांचे मन वळविण्यात यशस्वी झाले आहेत. अशातच समृद्धी महामार्गाला जागा देण्यास विरोध करणाºया शेतकरी संघर्ष समितीचा दुसरीकडे विरोध अजून कायम असून, त्यासाठी न्यायालयीन व राजकीय लढा लढला जात आहे.
विशेष म्हणजे, इगतपुरी तालुक्यात समृद्धीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात कचरू पाटील- डुकरे हे आजवर सर्वात अग्रेसर होते. जमिनीच्या मोबदल्यात पाटील यांना तीन कोटी ७२ लाख ७६ हजार १४६ रुपये अदा करण्यात आले आहेत. बुधवारी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, इगतपुरीचे प्रांत राहुल पाटील, तहसीलदार बबन काकडे यांनी कचरू पाटील यांच्याकडून खरेदी घेतली व त्याची रीतसर दुय्यम निबंधकांकडे नोंदही करण्यात आली.


शेतकरी संघर्ष समितीचे इगतपुरी तालुक्याचे अध्यक्ष कचरू पाटील- डुकरे यांची पिंपळगाव डुकरा येथे आई गंगूबाई दादा डुकरे व मुलगा संजय कचरू डुकरे यांच्या नावे असलेली सुमारे दोन हेक्टर ४२ आर बागायती जमीन समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने घेण्यात आली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.