Lack of millions of liters of water | लाखो लिटर पाण्याची नासाडी

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : चारीची क्षमता लक्षात न घेता प्रवाह पद्धतीने पाणी सोडलेडाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.
दोडी शिवारात सोमवारी रात्री ९ ला जेसीबीच्या सहाय्याने डाव्या कालव्यावरील चारी क्र मांक १ , २, व ३ चे पाणी बंद करण्यात आले. प्रवाही पध्दतीने पाणी देण्याचे ठरलेले नसताना चारी क्र मांक ४ मधून क्षमतेपेक्षा अधिक पाणी माळवाडीच्या दिशेने सोडण्यात आले.
रात्री अंधारात घडलेला प्रकार पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आला. पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी गणपत केदार, के. पी. आव्हाड, विष्णू साबळे, शंकर केदार, रामनाथ आव्हाड, रोहीत आव्हाड, शरद केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षमतेपेक्षा जास्त पाणी प्रवाहीत केल्याने चारीतून दोन्ही बाजूला पाणी उफाळून शेतात साचले. त्यामुळे शेतकºयांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. पाणी उफाळून भराव्याची माती वाहून गेल्याने तीन ठिकाणी माती खचली आहे.डाव्या कालव्यावरील पाच पाणी वापर संस्थांना लागणारे पाणी पूर्ण झाले होते. धरणातील उरलेल्या सिंचन पाण्याचे दुसºया आवर्तनासाठी नियोजन सुरु होते. त्यातच प्रवाही पाणी देण्याचा बेकायदा प्रकार घडल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला आहे. कारभारी शिंदे, भागवत घुगे, पाराजी शिंदे, शंकरराव केदार, सोपान आव्हाड, रामनाथ आव्हाड, शरद केदार, रमेश उगले आदींनी क्षेत्राबाहेर पाणी विकण्याचा आरोप अधिकाºयांवर केला आहे. गैरप्रकार बंद न झाल्यास पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.धरणात सिंचनाचे ३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. पाणी वापर संस्थांचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे प्रवाही पध्दतीने पाणी सोडले होते. सिंचनाचे पाणी बंद केले आहे.
- एस. एस. गोंदकर, उपअभियंता, पाटबंधारे विभाग सिंचनासाठी नसलेल्या ठिकाणी पाणी सोडण्यात आले. हा प्रकार अधिकाºयांच्या संगमताने झाला असून पाण्याची विक्र ी करण्यात आली. समितीच्या बैठकीत प्रवाही पाणी देण्याबाबत काहीही ठरले नव्हते. पाणी नासाडी संदर्भात जिल्हाधिकारी, आमदार, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देणार आहे.
- गणपत केदार, अध्यक्ष, रेणुका पाणी वापर संस्था दोडी.