कोतवालांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:27 AM2018-12-18T01:27:22+5:302018-12-18T01:27:46+5:30

गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.

 Kotwala's 'Bhikh Maango' movement | कोतवालांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

कोतवालांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

Next

नाशिकरोड : गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.  कोतवालांना सहाव्या वेतन आयोगानुसार चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करावा इतर विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कोतवालांनी कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसले आहेत. राज्य शासनाचे कोतवालांच्या मागण्या व आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी येणाऱ्या-जाणाºयांकडून भीक मागत घोषणा देत आंदोलन केले.
आंदोलनामध्ये महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष गणेश इंगोले, अ‍ॅड. सुरेश माने, बापू आहिरे, नितीन चंदन, राजेश केंडे, माधुरी हंकारे, माधुरी आहिरे, क्रांती जाधव, संजय राऊत, नामदेव शिरसाठ, रूपसिंग वसावे, गणेश गोसावी, दिनेश कोहकरे, हिरा निमजे आदींसह कोतवाल सहभागी झाले होते.

Web Title:  Kotwala's 'Bhikh Maango' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.