In KK Tiger College, students celebrate kite festival on the occasion of Makar Sankranti | के के वाघ महाविद्यालयात रंगला पतंगोत्सव, मकरसंक्रातीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केली काळी वेशभूषा

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये पतंगोत्सवाचा उत्साहमकरसंक्रातीच्या निमित्ताने काळ्या रंगाची वेशभूषा‘मॅफिक’ या सांस्कृतिक महोत्सवालाही सुरुवात

नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारची सुट्टी असतानाही मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा पतंगोत्सव चांगलाच रंगला. महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या काईट फेस्टीवलमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग घेऊन उंच उंच झेपावणाऱ्या पतंगांना ढील दिली.
पतंगोत्सवाच्या माध्यमातून के. के. वाघ महाविद्यालयातील मॅफिक या सांस्कृतिक महोत्सवालाही सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पतंगोत्सवात विद्यार्थ्यांनी परंपरा आणि सणाचा उत्साह साजरा करीत सहभाग घेतला. तसेच मकरसंक्रातीच्या निमित्ताने महाविद्यालयात ब्लॅक डे साजरा करण्यात आला. त्यामुळे बहूतांश विद्यार्थ्यांनी काळा रंगाची वेशभूषा करून या पतंगोत्सवात भाग घेतला. यावेळी उंच उंच ङोपवाणाऱ्या पंतगांचे नियंत्रण करताना वेगवेगळ्य़ा समुहांमध्ये स्पर्धा दिसून आली. सर्वात उंच ङोपावणारे पतंग आपलेच असावे यासाठी पंतगाला ढिल देण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विद्यार्थ्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला होता. तर संधी मिळताच दुसऱ्याची पतंग कापण्याची संधी मिळाल्यानंतर हलगीच्या ठेक्यावर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही सर्वाचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी विविधरंगी पतंगासह काईट फेस्टीवलमध्ये सहभाग घेतल्यामुळे महाविद्यालयीन परिसर रंगीत पतंगांनी फुलून गेला होता. दरम्यान, नायलॉन मांजावरील बंदीला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साध्या मांजाने पतंग उडविण्यास पसंती दिली आहे. तरुणाईसाठी पर्यावरण पुरक सण साजरे करण्याच्या दिशेने हा पतंगोत्सव नवीन पायंडा पाडणार असून ही बदलाची नांदी ठरेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.