पंचवटीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:33 AM2018-12-08T01:33:08+5:302018-12-08T01:33:22+5:30

पंचवटी परिसरातून घराच्या परिसरात खेळणाऱ्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kidnapping of minor child from Panchavati | पंचवटीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

पंचवटीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

Next

पंचवटी : पंचवटी परिसरातून घराच्या परिसरात खेळणाऱ्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील हिरावाडी भागातील दामोदरनगर येथील पाटाजवळच्या मुंजविहार सोसायटीतील रहिवासी गीता जाधव यांचा मुलगा धीरज शांती परमार (१२) घराच्या परिसरात खेळत असताना त्याचे अपहरण झाले आहे. या प्रकरणी गीता जाधव यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपहृत मुलगा फिर्यादीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा असून, त्याला त्यांच्या कायदेशीर रखवालीतून अज्ञात संशयितांनी पळवून नेल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी फिर्यादीच्या माहितीवरून पंटवटी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Kidnapping of minor child from Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.