पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:49 AM2018-12-18T01:49:37+5:302018-12-18T01:49:56+5:30

अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाºया काकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ एस़ नायर यांनी सोमवारी (दि़१७) दहा वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़ गंगाराम गोविंद राऊत (३३, रा़ मेहदर, बंगाळपाडा, ता़ कळवण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, २०१६ मध्ये ही घटना घडली होती़ सरकारी वकील गायत्री पटनाला व एस़ बी़ सरोदे यांनी या खटल्यात काम पाहिले़

 Kakas Saktamajjuri who raped a womb | पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकास सक्तमजुरी

पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकास सक्तमजुरी

Next

नाशिक : अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाºया काकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ एस़ नायर यांनी सोमवारी (दि़१७) दहा वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़ गंगाराम गोविंद राऊत (३३, रा़ मेहदर, बंगाळपाडा, ता़ कळवण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, २०१६ मध्ये ही घटना घडली होती़ सरकारी वकील गायत्री पटनाला व एस़ बी़ सरोदे यांनी या खटल्यात काम पाहिले़
जिल्हा व सत्र न्यायाधीश नायर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी बारा, तर अ‍ॅड़ एस़ बी़ सरोदे यांनी चार साक्षीदार तपासून न्यायालयात पुरावे सादर केले होते़  यामध्ये पीडित मुलगी, तिचे वडील, भाऊ व वैद्यकीय तसेच न्यायवैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले़ या खटल्यात न्यायाधीश नायर यांनी आरोपी गंगाराम राऊत यास दहा वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़  कळवण तालुक्यातील बंगाळपाडा येथे २०१६ मध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने बलात्कार केल्याची घटना घडली होती़ मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने या घटनेनंतर तब्बल ११ दिवसांनी पीडित मुलीच्या वडिलांनी कळवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ या प्रकरणी बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता़ कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधोर यांनी करून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते़

Web Title:  Kakas Saktamajjuri who raped a womb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.