‘न्याय आपल्या दारी’ : जिल्ह्यात फिरते न्यायालय अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:33 PM2019-03-26T17:33:09+5:302019-03-26T17:33:22+5:30

नाशिक : ‘शहण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’ ही म्हण आता कालबाह्य झाली आहे. न्यायव्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होत चालली ...

'Justice is your door': A jurisdictional campaign launched in the district | ‘न्याय आपल्या दारी’ : जिल्ह्यात फिरते न्यायालय अभियान

‘न्याय आपल्या दारी’ : जिल्ह्यात फिरते न्यायालय अभियान

googlenewsNext
ठळक मुद्देलोकअदालतीमध्ये १२२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.



नाशिक : ‘शहण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’ ही म्हण आता कालबाह्य झाली आहे. न्यायव्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होत चालली असून राज्य विधीसेवा प्राधिकरणाने तर आता थेट ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या दारापर्यंत न्यायालय पोहचविण्याचे अभिनव अभियान हाती घेतले आहे. याअंतर्गत पुढील महिनाभर हे अभियान जिल्ह्यात राबविले जाणार असून अभियानाचा शुभारंभ मंगळवारी (दि.२६) प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात या उपक्र मांतर्गत जिल्हयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघांंंच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६एप्रिलपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. याद्वारे नागरीकांना त्यांच्या घराजवळच न्यायालय उपलब्ध होणार असून यातील लोकअंदालतीत नागरीकांना तेथेच आपले खटले दाखल करता येणार आहेत. फिरते न्यायालय उमक्र माच्या कालावधीत नाशिक शहर व जिल्हयातील सर्व तालुकांमधील विधी सेवा समिती व इतर तालुका न्यायालयाच्या ठिकाणी जाऊन लोकअदालत व कायदेविषयक शिबीर घेण्यात येणार आहे. सोमवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत फिरत्या वाहनामध्ये दाखलपुर्व प्रकरणांसाठी लोकअदालत आयोजीत करण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये १२२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

Web Title: 'Justice is your door': A jurisdictional campaign launched in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.