मुरकुटेंकडून मनेगावकरांना जलसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:14 AM2019-06-06T00:14:45+5:302019-06-06T00:15:38+5:30

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना विविध सामाजिक संघटना मोफत पाणीपुरवठा करत आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशचिटणीस राजाराम मुरकुटे यांनी महिनाभरापासून टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करत आहे. मुरकुटे यांनी टॅँकरद्वारे महिनाभर दररोज सहा हजार लीटर पाणी वाड्या-वस्त्यांवर जाऊन मोफत देण्याचा उपक्रम राबविला आहे. या जलसेवेबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Junk service to Manegaonkar | मुरकुटेंकडून मनेगावकरांना जलसेवा

सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथे व वाड्या-वस्त्यांवर मोफत पाणीपुरवठा करताना राजाराम मुरकुटे.

googlenewsNext
ठळक मुद्देदिलासा : टॅँकरद्वारे दररोज ६ हजार लीटर पाणी

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना विविध सामाजिक संघटना मोफत पाणीपुरवठा करत आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशचिटणीस राजाराम मुरकुटे यांनी महिनाभरापासून टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करत आहे. मुरकुटे यांनी टॅँकरद्वारे महिनाभर दररोज सहा हजार लीटर पाणी वाड्या-वस्त्यांवर जाऊन मोफत देण्याचा उपक्रम राबविला आहे. या जलसेवेबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
मनेगावसह लगतच्या वस्त्यांवर यंदा मोठी पाणीटंचाई जाणवली. पाणीटंचाईच्या संकटातातून काहीअंशी सुटका झाली. राजाराम मुरकुटे यांनीदेखील या संकटात मदतीसाठी पुढाकार घेतला. यंदा ही विहीर कोरडीठाक असल्याने पदरमोड करून जलसेवा सुरू ठेवली.

Web Title: Junk service to Manegaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.