पिंपळगाव बसवंत येथे जलशाहिरी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 06:29 PM2019-05-16T18:29:43+5:302019-05-16T18:31:08+5:30

  पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी केली असून, आजच्या राज्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन संवर्धन कामात नियोजन व धोरणांचाच दुष्काळ निर्माण केला आहे. पाणी संकटावर मात करण्यासाठी पाणी बचत-नियोजन ही लोकचळवळ बनावी, असे मत प्रा. अशोक सोनवणे यांनी लोकशाहीर दिनानिमित्त पाचव्या जलशाहिरी परिषदेत बोलताना व्यक्त केले.

Jalshahiri Parishad at Pimpalgaon Baswant | पिंपळगाव बसवंत येथे जलशाहिरी परिषद

पिंपळगाव बसवंत येथे लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक आयोजित जलशाहिरी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. अशोक सोनवणे, प्रा. दिनेश अनारसे, प्रा. शरद दि. शेजवळ, महेंद्र गायकवाड , कवी नुमान शेख, कवी सोमनाथ गायकवाड आदी. 

Next
ठळक मुद्देलोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक व बी.पी. पाटील ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स पिंपळगांव बसवंत यांच्या वतीने बुधवारी पाचव्या जलशाहिरी परिषदेत प्रा. सोनवणे बोलत होते.

पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी केली असून, आजच्या राज्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन संवर्धन कामात नियोजन व धोरणांचाच दुष्काळ निर्माण केला आहे. पाणी संकटावर मात करण्यासाठी पाणी बचत-नियोजन ही लोकचळवळ बनावी, असे मत प्रा. अशोक सोनवणे यांनी लोकशाहीर दिनानिमित्त पाचव्या जलशाहिरी परिषदेत बोलताना व्यक्त केले.

महकवी वामनदादा कर्डक यांनी सामाजिक प्रबोधन चळवळीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, बुद्ध आंबेडकरवादी गीतांसोबतच त्यांनी जल जंगल जमीन पर्यावरण महिला, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या जीवनावर लेखन केले आहे. त्यांच्या याच साहित्य शाहिरीला उजाळा देऊन त्यांचा सामाजिक न्यायाचा ध्यास असलेले विचार व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कवी गायक लेखक साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून पाणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आपल्या साहित्य प्रतिभेचा हाती घेऊन आपण लोक कलेतून लोक मनोरंजन व लोक मनोरंजनातून लोक जागृती करीत राहावे याकरिता कर्डक यांचा स्मृतिदिन ‘लोकशाहीर’ म्हणून साजरा करण्यात आला. सुफीकवी नुमान शेख अध्यक्षस्थानी होते.
परिषदेस प्रा. दिनेश अनारसे, प्रा. किरण आरोटे, प्रा. कावेरी देवरे, प्रा. अमोल ताजने, प्रा. पगारे, प्रा. प्रकाश भंडारे, प्रा. सचिन बिडवे उपस्थित होते. कवी सोमनाथ गायकवाड, कवी भामरे व अभिषेक गांगुर्डे यांनी आपल्या जल, जंगल, जमीन-पर्यावरण संवर्धन काव्यगीते सादर केली. प्रास्ताविक प्रा. शरद दि. शेजवळ यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले.
 
Web Title: Jalshahiri Parishad at Pimpalgaon Baswant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.