बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती तिसरे महायुद्ध टाळू शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 04:04 PM2018-12-06T16:04:13+5:302018-12-06T16:04:45+5:30

येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले. येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी खरात बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.

 The Jal Nitya of Babasaheb Ambedkar could help prevent the Third World War | बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती तिसरे महायुद्ध टाळू शकेल

बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती तिसरे महायुद्ध टाळू शकेल

googlenewsNext
ठळक मुद्दे जी.डी. खरात: बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान


येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी खरात बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य हे विविध आयामानी सिद्ध झालेले होते. मुळात अर्थतज्ञ असणा्या डॉ. बाबासहेब आंबेडकरांचा सामाजिक, पर्यावरणीय, भौगोलिक, विज्ञानवादी, तत्त्वज्ञान अश्या सर्वच विषयाचा आवाका मोठा होता. भारताच्या जलनीतीच्या संदर्भात नदीजोड प्रकल्पाची भूमिका प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. तो विचार जागतिक पातळीवर स्वीकारला गेला तर प्रत्येक राष्ट्र पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जे तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल हे भाकीत केले गेले आहे ते खोटे ठरू शकेल असे मत खरात यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने नार-पार नदीजोड प्रकल्पासंदर्भात प्रशांत हिरे यांनी वेळोवेळी मांडलेली वैचारिक भूमिका त्याच पद्धतीची असल्याचे ते म्हणाले. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत कारण तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती प्रत्यक्षात राबविली गेली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. भाऊसाहेब गमे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली संविधान निर्मितीचे महत्व विषद केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. गायकवाड, जयमाला सोदे, टी. एस. सांगळे, डी. व्ही. सोनवणे, डी. बी. मामुडे, प्रा. भदाणे, उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले तर आभार प्रा. पंढरीनाथ दिसागज यांनी मानले.
कॅप्शन :महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करताना भाऊसाहेब गमे, शिवाजी गायकवाड, जी. डी. खरात, धनराज धनगर, जयमाला सोदे, पंढरीनाथ दिसागज (06येवला आंबेडकर कॉलेज)

Web Title:  The Jal Nitya of Babasaheb Ambedkar could help prevent the Third World War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.