नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना साचेबद्ध माहिती देणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:16 PM2018-07-07T17:16:12+5:302018-07-07T17:18:05+5:30

ग्रामपंचायतींच्या विविध योजनाची अंमलबजावणी ग्रामसेवकांकडून करण्यात येत असल्याने ग्रामस्तरावरी विविध प्रकारचे अहवाल व माहितीही ग्रामसेवकांकडूनच घेण्यात येते. ही माहीती आॅनलाईन पद्धतीने मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सर्व माहितीचा समावेश असेले एक्सेलशीट तयार केले असून यापुढे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना साचेबद्ध नमूण्यातच सर्व संबधीत माहिती जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना सादर करावी लागणार आहे.

It is mandatory to give the written information to the Gram Panchayats in Nashik district | नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना साचेबद्ध माहिती देणे बंधनकारक

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना साचेबद्ध माहिती देणे बंधनकारक

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतींना द्यावी लागणार साचेबंद माहिती ग्रामपंचायत विभागाच्या आढावा बैठकीत निर्णयतालुका, जिल्हास्तरीय माहिती संकलन होणार सोयीस्कर

नाशिक : ग्रामपंचायतींच्या विविध योजनाची अंमलबजावणी ग्रामसेवकांकडून करण्यात येत असल्याने ग्रामस्तरावरी विविध प्रकारचे अहवाल व माहितीही ग्रामसेवकांकडूनच घेण्यात येते. ही माहीती आॅनलाईन पद्धतीने मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सर्व माहितीचा समावेश असेले एक्सेलशीट तयार केले असून यापुढे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना साचेबद्ध नमूण्यातच सर्व संबधीत माहिती जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना सादर करावी लागणार आहे.
जिल्हा व तालुकास्तरावर विविध आढावा बैठकींसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामपंचायत विभागाने जिल्हा परिषदेला सविस्तर व वेळेत मिळावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायती संदर्भातील सर्व विषयांचा अंतर्भाव असलेला हा एक्सेलमधील नमूणा तयार केला आहे, नमूण्यातच सर्व ग्रामपंचायतीकडून माहिती मागवली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत तसेच तालुकानिहाय माहिती उपलब्ध होणार असून आढावा घेण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीमधील कामाची प्रगती कळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. यात घरपट्टी वसुली, पाणी पट्टी वसूली, किरकोळ मागणी, कर वसूली, जिल्हा ग्राम निधी/कर्ज, मासिक सभा, महिला व ग्रामसभा, सदस्य रिक्त पद, नविन निवडणूक माहीती, टि.सी. एल.साठा, पाणी पुरवठा स्त्रोत, लेखा परिक्षण, अफरातफर अहवाल, १४ वित्त पंच वार्षिक आराखडा आदि महत्वाच्या विषयांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आपले सरकार अंतर्गत सुविधा व पेपरलेस काम, लेखापरीक्षण अहवाल आदि विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस ग्रामपंचायत विभागाचे सहायक गट विकास अधिकारी, आपले सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक तसेच तालुक्यातील विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), तालुका व्यवस्थापक आदि उपस्थित होते.

Web Title: It is mandatory to give the written information to the Gram Panchayats in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.