बिनचेहऱ्याच्या झुंडींचे मुक्त विचारांवर आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:43 AM2019-03-18T01:43:12+5:302019-03-18T01:43:30+5:30

प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्यांची ओळख स्पष्ट नसल्यामुळे या माध्यमातून मुक्तविचार मांडणाऱ्यांवर सोशल मीडियातील अशा बिनचेहºयांच्या झुंडींचे सध्याच्या काळात आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.

Invasion of Free Thinkers of Binchehara | बिनचेहऱ्याच्या झुंडींचे मुक्त विचारांवर आक्रमण

ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान करताना प्रेस क्लब आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनंत बागाईतदार यांच्यासह प्रा. संगीता बाफना, डॉ. शंकर बोºहाडे, जयप्रकाश जातेगावकर, वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, सुरेश भटेवरा, प्रा. विलास औरंगाबादकर, नानासाहेब बोरस्ते आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देखांडेकर : सावानाचा जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान

नाशिक : प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्यांची ओळख स्पष्ट नसल्यामुळे या माध्यमातून मुक्तविचार मांडणाऱ्यांवर सोशल मीडियातील अशा बिनचेहºयांच्या झुंडींचे सध्याच्या काळात आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.
मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि.१७) नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे राजीव खांडेकर यांना प्रेसक्लब आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनंत बागाईतदार यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारास उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, शैलेंद्र तनपुरे, श्रीमंत माने यांच्यासह सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, अभिजित कुलकर्णी, नानासाहेब बोरस्ते, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी खांडेकर म्हणाले, सोशल मीडियातून प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेले अंधारातले लोक मुक्त विचार मांडणाºयांसह विविध राजकीय नेत्यांना व त्यांच्या पक्षांनाही लक्ष करतात. अशा प्रकारांतून ते मुक्त विचार मांडणाºयांचा मनोभंग करण्याचा प्रयत्न करतात. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संगीता बाफना यांनी केले, तर डॉ. शंकर बोºहाडे यांनी आभार मानले.
आता अशा बिनचेहºयाच्या झुंडीच सध्या सोशल मीडियावर वावरत असून, याची सुरुवात भाजपाने २०१४च्या निवडणुकीत केली, त्यावेळी अशा झुंडी राहुल गांधी यांना पप्पू म्हणून संबोधत होत्या. आता दुसºया झुंडी त्याच नरेंद्र मोदींना ‘चौकीदार चोर हैं’ असे संबोधत आहेत. सोशल माध्यमांवरील या युद्धात, प्रमुख प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Web Title: Invasion of Free Thinkers of Binchehara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.