अंदरसूलला जिल्हा परिषद शाळा बनल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:54 AM2018-02-09T00:54:09+5:302018-02-09T00:54:20+5:30

अंदरसूल : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने येथील तेरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत स्मार्ट एलईडी संच देऊन शाळा डिजिटल करण्यात आल्या. यासाठी सुमारे बारा लाख रु पयांचा निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च करण्यात आला.

Insulus became the District Council for digital schools | अंदरसूलला जिल्हा परिषद शाळा बनल्या डिजिटल

अंदरसूलला जिल्हा परिषद शाळा बनल्या डिजिटल

googlenewsNext

अंदरसूल : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने येथील तेरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत स्मार्ट एलईडी संच देऊन शाळा डिजिटल करण्यात आल्या. यासाठी सुमारे बारा लाख रु पयांचा निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी जनार्दन वाघ यांनी दिली. दरम्यान, मुलांच्या शाळेला असलेल्या संरक्षक भिंतीची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असल्याने या संरक्षक भिंतीच्या दुरु स्तीसाठीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी शाळेचे शिक्षक दीपक थोरात यांनी मदतीची मागणी केली असता याबाबत प्रस्ताव तयार करून प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सरपंच विनिता सोनवणे यांनी दिले. याप्रसंगी उपसरपंच वैशाली जानराव, राजेंद्र पागिरे, दत्तू सोनवणे, नंदकिशोर धनगे, सुवर्णा बागुल, जनार्दन वाघ, चंद्रभान पवार, बाबासाहेब बेरगळ, दिनेश मानकर, सुनील देशमुख, सोपान औटे, बाळासाहेब देशमुख, दादा नाईकवाडी, पुंडलिक पवार, आशा महाले, मंगला देशमुख, उषा मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Insulus became the District Council for digital schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा