इंदिरानगर ई ट्रेड शॉपी मॉल सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 07:00 PM2018-08-21T19:00:01+5:302018-08-21T19:01:08+5:30

नाशिक : गुंतवणुकीवर बँकेपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी ई शॉपीच्या सात संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार तक्रारीसाठी पुढे येत असून सुरक्षेच्या कारणास्तव ई शॉपी मॉलला कुलूप लावण्यात आले आहे़ दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी या संचालकांची माहिती जमा करण्याचे व शोध घेण्याचे काम सुरू केले आहे़

Indiranagar E-Trade Shopy Mall Seal | इंदिरानगर ई ट्रेड शॉपी मॉल सील

इंदिरानगर ई ट्रेड शॉपी मॉल सील

Next
ठळक मुद्देगुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

नाशिक : गुंतवणुकीवर बँकेपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी ई शॉपीच्या सात संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनीगुन्हा दाखल केल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार तक्रारीसाठी पुढे येत असून सुरक्षेच्या कारणास्तव ई शॉपी मॉलला कुलूप लावण्यात आले आहे़ दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी या संचालकांची माहिती जमा करण्याचे व शोध घेण्याचे काम सुरू केले आहे़

गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगरमधील अंकीत लिरील हर्ट सोसायटीतील रहिवासी सुशील पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ८ फेबु्रवारी २०१८ ते २० आॅगस्ट २०१८ या कालावधीत संशयित मुकेश पाटील, ज्ञानेश्वर सीताराम पाटील, सुधाकर घोटेकर, सागर नांद्रे, दिनेश बावीस्कर, रवी त्रिपाठी व जफर यांनी संगनमत करून ई शॉपी ट्रेड कंपनी स्थापन केली़ इंदिरानगरमधील बापू बंगल्याशेजारील कंपनीचे कार्यालय सुरू करून बँकेपेक्षा जास्त लाभाचे अमिष दाखविले़ या संचालकाच्या अमिषाला बळी पडलेल्या पाटील यांनी ई शॉपीमध्ये १२ लाख ५३ हजार ६०० रुपयांची गुंतवणू केली़ मात्र,संचालकांनी पाटील यांनी गुंतवूविलेली रक्कम व त्यावरील लाभांश न देता या रकमेचा अपहार करून फसवणूक केली़

ई ट्रेड शॉपीच्या संचालकांनी केवळ नाशिक शहर व जिल्ह्यातीलच नव्हे तर धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचीही फसवणूक केल्याचे समोर येत आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने ई शॉपी मॉल सील केला आहे़ दरम्यान, मंगळवारी लोकमतच्या प्रमुख अंकात प्रसिद्ध झालेल्या ई शॉपीची फसवणुकीची बातमी गुंतवणूकदारांनी सोशल मीडीयावर व्हायरल केली असून तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे़

पोलीस ठाण्यात संपर्क साधा
ई शॉपीच्या गुंतवणूकदारांमध्ये नाशिकसह अन्य जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांचाही समावेश असल्याचे समोर येते आहे़ त्यामुळे या कंपनीने त्या ठिकाणी कार्यालये वा मॉल सुरू केले आहेत का? संचालक कुठे आहेत? याबाबत माहिती घेतली जाते आहे़ ई शॉपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झालेल्या नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा़

Web Title: Indiranagar E-Trade Shopy Mall Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.