भारतीय वन सर्वेक्षण अहवाल : दंडकारण्य नव्हे; ओसाड नाशिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:57 PM2018-02-18T17:57:27+5:302018-02-18T18:01:15+5:30

दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे.

Indian Forest Survey Report: Not dence forest; open land! | भारतीय वन सर्वेक्षण अहवाल : दंडकारण्य नव्हे; ओसाड नाशिक!

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल : दंडकारण्य नव्हे; ओसाड नाशिक!

googlenewsNext
ठळक मुद्देघनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र नष्ट ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्यची गरजसाडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले

नाशिक : रामायणकाळात दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकची ओळख काळानुरूप नष्ट झाली असून हे भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. नाशिकचे १५ हजार ५३० चौरस किलोमीटर इतके भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी केवळ साडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले आहेत. उर्वरित ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड झाले आहे. घनदाट जंगलाचे प्रमाण मात्र शुन्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून आता नाशिककरांनी खºया अर्थाने ‘देवराई’ विकसीत करण्याचा विडा उचलणे गरजेचे आहे.
दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी वनमहोत्सवांतर्गत जरी वन मंत्रालयाकडून कोटीच्या कोटी वृक्षलागवडीचे उड्डाण केले जात असले तरी प्रत्यक्षात नाशिकचे जंगलाचे क्षेत्र विरळच आहे. वृक्षारोपणाचा शासकीय आकडा मांडला जातो मात्र रोपांचे संवर्धन करत वृक्षांमध्ये रुपांतर झाल्याचा आकडा शासकिय स्तरावरुन पुढे येत नाही ही शोकांतिका आहे.
घनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र संपुर्णत: नष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात नाशिककरांना अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण अनुभवयास येईल का, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. निसर्गप्रेमी नाशिककरांनी ख-या अर्थाने वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्य करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील वनसंपदा नष्ट होत असून वनविभागालाही ती वाढविणे अशक्य होत आहे. वनविभागाला जोपर्यंत लोकसहभागाची जोड मिळणार नाही, तोपर्यंत जिल्ह्याचे वनसंवर्धन होणे अशक्य असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. झाडे लावणे, ती जगविणे आणि सांभाळणे ही केवळ वनविभागाची जबाबदारी आहे, असा गैरसमज नाशिककरांना काढून टाकावा लागणार आहे. कारण २०१५नंतर भारतीय वन सर्वेक्षण या राष्ट्रीय संस्थेकडून प्रसिध्द झालेल्या अहवालामधून राज्यासह नाशिकची वनस्थिती चिंताजनक असल्याचे समोर येते.

देवराई-वनराई’ उपक्रम करणार मात
शहरात आपलं पर्यावरण संस्थेने तीन ते चार वर्षांपुर्वी देवराई व वनराई निर्मितीसाठी पुढाकार घेत वनविभागाच्या ओसाड वनक्षेत्रावर लोकसहभागातून वृक्षारोपण करुन संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. सातपूर येथे देवराई व म्हसरुळ येथील वनराईमध्ये अनुक्रमे अकरा हजार व साडे पाच हजार रोपांचे संगोपन मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. रोपट्यांचे वृक्षांमध्ये रुपांतर होऊ लागले आहे. जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

Web Title: Indian Forest Survey Report: Not dence forest; open land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.