वेगवान प्रगती करणारा भारत जगात एकमेव : गोविलकर

By admin | Published: June 21, 2017 10:13 PM2017-06-21T22:13:16+5:302017-06-21T22:13:16+5:30

आपला देश जगात वेगवान प्रगती करणारा देश असल्याचे याच संस्थेने एक नव्हे, दोन नव्हे तर सहा अहवालांमध्ये सातत्याने जाहीर केले आहे.

India is the fastest growing country: Govilkar | वेगवान प्रगती करणारा भारत जगात एकमेव : गोविलकर

वेगवान प्रगती करणारा भारत जगात एकमेव : गोविलकर

Next

नाशिक : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेकडे एकेकाळी कर्ज मागणारा आपला देश जगात वेगवान प्रगती करणारा देश असल्याचे याच संस्थेने एक नव्हे, दोन नव्हे तर सहा अहवालांमध्ये सातत्याने जाहीर केले आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.
केंद्र सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास’ संमेलनात मुख्य वक्ते म्हणून गोविलकर बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेता दिनकर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोविलकर यांनी, भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर देशपातळीवर झालेले निर्णय आणि त्यामुळे घडून आलेला बदल व जनतेला मिळालेला लाभ याविषयीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी त्यांनी मागील सरकार आणि विद्यमान सरकार यांच्या कार्यप्रणालीचा तुलनात्मक आढावा घेतला. यावेळी गोविलकर म्हणाले, मागील सरकारला ज्या योजना सक्षमपणे राबविता आल्या नाहीत त्या योजना भाजपाचे सरकार अंमलात आणत आहे. यापूर्वीचे सरकार योजना जाहीर करणारे होते तर भाजपा सरकार योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत देशाचा विकास साधणारे आहे, असेही ते म्हणाले. सोने गहाण टाकणाऱ्या या देशाची आज समृध्दीकडे वाटचाल सुरू असल्याचेही गोविलकर म्हणाले.

Web Title: India is the fastest growing country: Govilkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.