पांडवनगरी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:05 AM2018-04-17T01:05:52+5:302018-04-17T01:05:52+5:30

पांडवनगरी परिसरात सुुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यांचे मिळकतधारक बाहेरगावी स्थायिक झाले असून, भाडेतत्त्वावर कोण राहतात, काय करतात याचा थांगपत्ता नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढच होत चालली असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Increase in criminality in Pandavnavni area | पांडवनगरी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ

पांडवनगरी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ

googlenewsNext

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात सुुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यांचे मिळकतधारक बाहेरगावी स्थायिक झाले असून, भाडेतत्त्वावर कोण राहतात, काय करतात याचा थांगपत्ता नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढच होत चालली असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सुमार पंधरा वर्षांपूर्वी पांडवनगरी परिसरात सरकारी योजनेतून सुमारे अडीच हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. बहुतेककर्मचाऱ्यांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. शासकीय कर्मचाºयांचा हा एकप्रकारे व्यवसाय झाला असून, स्वत: मात्र आलिशान घरात राहून सरकारी घरे मात्र भाडेतत्त्वावर देण्याचे प्रकार वाढीस लागत आहे. याप्रकारे ज्या गरजू कर्मचाºयांना खºया अर्थाने घरांची गरज आहे त्यांना मात्र घरे मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यातच सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देणारे मिळकतधारक बाहेरगावी स्थायिक आहेत. त्यांची घरे भाडेतत्त्वावर देण्याचे व्यवहार काही स्थानिक दलाल करीत आहेत. सदर दलाल सदनिका भाडेतत्त्वावर देताना संबंधित भाडेकरूची माहिती स्वत: घेत नाही आणि पोलीस ठाण्यात कळवत नाही त्यामुळे सदर सदनिकांमध्ये कोण राहते? काय करते? याचा थांगपत्ता लागत नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृतीत वाढ होत असून, परिसरातील सहा ते सात जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे पाच दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक ३०चे दोन नगरसेवकांच्या वाहनांच्या काचा फोडल्या प्रकरणी पांडवनगर परिसरातील दोन जणांना अटक केली होती, तर एकास ताब्यात घेतले होते. अशाप्रकारे एकामागून एक गुन्हेगारीच्या घटना परिसरात दिवसगणिक वाढतच आहे.
तपासणी मोहीम हाती घ्यावी
परिसरात वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी एकाच वेळेस मोठा फौजफाटा घेऊन भाडेकरू तपासणी मोहीम हाती घ्यावी आणि भाडेकरूंची माहिती दडविणाºयावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परिसरातील मिळकतधारकांनी सदनिका भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय मांडला आहे.

Web Title: Increase in criminality in Pandavnavni area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.