मॅग्नेटिक चीप असलेली डेबिट कार्ड ब्लॉक झाल्यामुळे रोखीच्या व्यवहारांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:24 AM2019-01-05T01:24:52+5:302019-01-05T01:27:44+5:30

बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या खातेदारांना ३१ डिसेंबरपर्यंत एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, नवीन वर्षाचे चार दिवस उलटूनही अनेक ग्राहकांना नवीन ईएमव्ही कार्ड उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे विविध बँकांमध्ये रोखीचे व्यवहार वाढले असून, ग्राहकांना रांगेत उभे राहून व्यवहार करावे लागत आहेत.

Increase in cash transactions due to debit card blocking of magnetic chips | मॅग्नेटिक चीप असलेली डेबिट कार्ड ब्लॉक झाल्यामुळे रोखीच्या व्यवहारांमध्ये वाढ

मॅग्नेटिक चीप असलेली डेबिट कार्ड ब्लॉक झाल्यामुळे रोखीच्या व्यवहारांमध्ये वाढ

Next
ठळक मुद्दे बॅँकांमध्ये ग्राहकांची गर्दीनवीन इएमव्ही चीप असलेल्या कार्डांचा तुटवडा दिवसाला २० हजारांची मर्यादा असल्याने अडचणीत भर

नामदेव भोर। नाशिक : बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या खातेदारांना ३१ डिसेंबरपर्यंत एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, नवीन वर्षाचे चार दिवस उलटूनही अनेक ग्राहकांना नवीन ईएमव्ही कार्ड उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे विविध बँकांमध्ये रोखीचे व्यवहार वाढले असून, ग्राहकांना रांगेत उभे राहून व्यवहार करावे लागत आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार सर्व बँकांनी एटीएममधून डेबीट कार्डद्वारे दिवसभरात ४० हजारांऐवजी केवळ २० हजार रुपयेच काढण्याचे निर्बंध घालण्यात आले. ३१ डिसेंबरला सर्व मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली डेबिट कार्डही ब्लॉक करण्यात आली. परंतु ज्या ग्राहकांची एटीएम वा डेबिट कार्ड ब्लॉक झाली आहेत त्यांना ईएमव्ही चीपचो नवीन कार्ड मिळालेले नाही. अशांना आता बँकेत रांगा लावून आपले व्यवहार करावो लागत आहेत. परिणामी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच बँकांमध्ये रोख व्यवहार करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एटीएम तथा डेबीट कार्ड उपलब्ध होऊनही दिवसभरात केवळ २० हजार रुपयेच खात्यातून काढता येत असल्याने मोठी रक्कम काढण्यासाठीही ग्राहकांना बँकांमध्येच यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची रांग वाढल्याचे बँक अधिकाºयाने सांगितले.
बाजारपेठेवरही परिणाम
देशात नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर डेबिट कार्डद्वारो कॅशलेस व्यवहार करणाºया ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मोबाइल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध असला तरी अनेक जण तांत्रिक ज्ञानाअभावी व सुरक्षिततेच्या कारणामुळे डेबिट कार्डाद्वारेच व्यवहार करण्याला प्राधान्य दिले.
पण ३१ डिसेंबरला कार्ड ब्लॉक झाल्यामुळे अशा ग्राहकांचीही गैरसोय झाली असून, बाजार पेठेतील रोख व्यवहारांमध्येही वाढ झाली आहे.

Web Title: Increase in cash transactions due to debit card blocking of magnetic chips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.