भिकाºयानेच केला भिकाºयाचा खूनरामकुंडावरील घटना : बॅग फाडल्याचा राग; बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:04 AM2017-12-03T01:04:12+5:302017-12-03T01:05:09+5:30

गंगाघाटावरील रामकुंड परिसरात दोघा भिकाºयांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिकाºयाने दुसºया भिकाºयाच्या पायावर चाकूने वार केले तसेच हाताने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़

The incident happened in the murder case of Bhikrampada: A rage of bag tearing; Breathless assault | भिकाºयानेच केला भिकाºयाचा खूनरामकुंडावरील घटना : बॅग फाडल्याचा राग; बेदम मारहाण

भिकाºयानेच केला भिकाºयाचा खूनरामकुंडावरील घटना : बॅग फाडल्याचा राग; बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देदोघेही फिरस्ते , भिक्षा मागण्याचे काम करतातउपचारादरम्यान त्याचा मृत्यू

पंचवटी : गंगाघाटावरील रामकुंड परिसरात दोघा भिकाºयांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिकाºयाने दुसºया भिकाºयाच्या पायावर चाकूने वार केले तसेच हाताने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़ अरुण भामरे (५६) असे खून झालेल्या भिकाºयाचे नाव असून, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मूळचा उत्तर प्रदेशातील बºहाणपूर येथील भिकारी संशयित अनिल बाबुराव आपटे (५४) यास ताब्यात घेतले आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामकुंड परिसरात मयत भामरे व संशयित आपटे हे दोघेही फिरस्ते असून, ते भिक्षा मागण्याचे काम करतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत रामकुंड परिसरात बसलेले असताना भामरे याने आपटे याची बॅग फाडली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला व संतापलेल्या आपटेने भामरेला चापटीने मारहाण करीत छोट्या चाकूने डाव्या पायावर वार केले़ यामध्ये गंभीर जखमी झालेला भामरे हा घटनास्थळी तसाच पडून होता तर त्याच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता़ त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ भामरेचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली असता दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती महिलेकडून मिळाली. त्यानुसार हवालदार सचिन म्हस्दे, विलास बस्ते, सतीश वसावे, भूषण रायते आदींनी होळकर पूल, गंगाघाट, स्मशानभूमी, टाळकुटेश्वर पूल, भद्रकाली परिसरात संशयिताचा शोध सुरू केला. त्याची सखोल चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे तपासात समोर आले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वीही वादातून खून
पंचवटी कारंजा परिसरात काही महिन्यांपूर्वीच झोपण्याच्या वादातून भिकाºयाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ त्यानंतर आता पुन्हा रामकुंड परिसरात भिकाºयाच्या खुनाची घटना घडली आहे़

Web Title: The incident happened in the murder case of Bhikrampada: A rage of bag tearing; Breathless assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून