जैव-वैदयक कचरा व्यवस्थापन मोहीमेचा नाशिक जिलह्यातुन शुभारंभ, आमदार देवयानी फरांदे यांनी केले उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:50 PM2017-12-08T14:50:48+5:302017-12-08T15:30:05+5:30

Inaugurated by MLA Devyani Farande from Nashik district of Bio-Vet waste management campaign | जैव-वैदयक कचरा व्यवस्थापन मोहीमेचा नाशिक जिलह्यातुन शुभारंभ, आमदार देवयानी फरांदे यांनी केले उद्घाटन

जैव-वैदयक कचरा व्यवस्थापन मोहीमेचा नाशिक जिलह्यातुन शुभारंभ, आमदार देवयानी फरांदे यांनी केले उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देकचऱ्याची व्यवस्थापन प्रणाली व्यक्तीवर नव्हे, प्रक्रियेवर आधारीत असावीनाशिक जिल्ह्यातील पथदर्शी अभियानाचे उद्घाटन जैव वैद्यक कचरा व्यवस्थापनासाठी कचराकुंडयांचे वितरण

नाशिक : जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचऱ्याचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही,तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भिती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव- वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. त्यासाठी जैव वैद्यक कचऱ्याचे दुष्परीणाम लक्षात घेऊन या कचऱ्याची व्यवस्थापन प्रणाली ही व्यक्तीवर नव्हे तर प्रक्रियेवर आधारीत असावी, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्लोबल इनव्हायरमेंट फॅसिलीटी (जीईए) युनायटेड नेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायङोशन (युनिडो) व केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या संयुक्त ह्यजैव-वैद्यकीय कचऱ्याचे पर्यावरणदृष्ट्या सुगोग्य व्यवस्थापनह्ण प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातन सुरू केलेल्या पथदर्शी अभियानाचे शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये देवयानी फरांदे यांच्या हस्ते शुक्रावारी (दि.8) उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विएन्ना येथील युनिडोच्या मुख्यालयातील प्रकल्प व्यवस्थापक एर्लिडा गलवेन, केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाचे संचालक मनोज कुमार गांगेया राज्य पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव सतीश गवळी, जीईएप व युनिडोचे प्रादेशिक समन्वयक डॉ. शक्तीप्रसाद धुआ, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना फरांदे यांनी जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी असून यातील डॉ. महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना एमपीसीबीच्या अधिका:यांनी डॉक्टरांना त्याचा त्रस होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही सांगितले. तर तसेच रुग्णालयालय व्यवस्थापनात औषधनिर्माण शास्त्रातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते व सतीश गवळी यांच्या हस्ते जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासंबधी जनजागृती करणाऱ्या मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना जैव वैद्यक कचऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक कचराकुंडयांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरणही करण्यात आल्या.

Web Title: Inaugurated by MLA Devyani Farande from Nashik district of Bio-Vet waste management campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.