श्रवण भक्तीचे महत्त्वाचे स्थान : जगन्नाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:50 AM2018-05-20T00:50:47+5:302018-05-20T00:50:47+5:30

ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय ऐश्वर्य, योग, अनन्यभक्ती व ज्ञान यावर आधारित आहे. नवविधा भक्ती पैकी श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जगन्नाथ शिंदे यांनी केले.

Important place for Shravan Devotion: Jagannath Shinde | श्रवण भक्तीचे महत्त्वाचे स्थान : जगन्नाथ शिंदे

श्रवण भक्तीचे महत्त्वाचे स्थान : जगन्नाथ शिंदे

googlenewsNext

नाशिकरोड : ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय ऐश्वर्य, योग, अनन्यभक्ती व ज्ञान यावर आधारित आहे. नवविधा भक्ती पैकी श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जगन्नाथ शिंदे यांनी केले. दत्तमंदिररोड लायन्स हॉल येथील श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित वसंत व्याखानमालेत ज्ञानेश्वरी अध्याय ९वा या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना शिंदे यांनी नवव्या अध्यायातील पहिली ओवी ‘तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे’ या ओवीचे निरूपण केले. सामान्य माणसाच्या प्रतिज्ञा या स्वत: हितासाठी, लोभासाठी असतात. असामान्य माणसाच्या प्रतिज्ञा या वैयक्तिक सुखासाठी, राजकारणासाठी असतात. देवाच्या प्रतिज्ञा या भक्तासाठी, धर्मरक्षणासाठी असतात. परंतु नवव्या अध्यायातील पहिल्या ओवीची प्रतिज्ञा ही संतांची आहे. उदार दृष्टिकोन, समाजहित व सर्व वर्गासाठी आहे. त्यासाठी वैयक्तिक स्वार्थ कुठलाही नसतो. ज्ञानदेव वैष्णव मोठा यांनी ही प्रतिज्ञा केली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. श्रवणाने मोक्ष सुखाची प्राप्ती मानवाला करता येते. भौतिक सुख मानवाला पूर्ण सुख देऊ शकत नाही. शेवटी आध्यात्मिकता जीवनास पूर्णत्व आणते. मी कोण, कुठून आलो, कसे आलो, कशासाठी आलो, स्वत:ची माझी ओळख मला होत नाही, स्वत:ची ओळख हेच अध्यात्म आहे. अध्यात्माद्वारे मनुष्याला पुर्णत्व प्राप्त होते, असे शिंदे यांनी सांगितले.  आजचे व्याख्यान,  विषय : ज्येष्ठांची अर्थव्यवस्था,  वक्ते : माधवराव भणगे

Web Title: Important place for Shravan Devotion: Jagannath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक