बालक-मातेसाठी स्तनपानाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:01 PM2018-09-10T18:01:03+5:302018-09-10T18:01:31+5:30

आईच्या दुधातील रोगप्रतिकारक द्रव्यांमुळे बाळाचा जंतुसंसर्ग व किरकोळ आजारांपासून बचाव होतो (जसे की जुलाब, उलट्या, न्यूमोनिया). आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौद्धिक व मानसिक क्षमता अधिक असते. भावी आयुष्यात स्थूलता, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या रोगांपासून संरक्षण मिळते.

Importance of breastfeeding for child and mother | बालक-मातेसाठी स्तनपानाचे महत्त्व

बालक-मातेसाठी स्तनपानाचे महत्त्व

googlenewsNext
ठळक मुद्देबाळाला रोगांपासून संरक्षण मिळते.

आईच्या दुधातील रोगप्रतिकारक द्रव्यांमुळे बाळाचा जंतुसंसर्ग व किरकोळ आजारांपासून बचाव होतो (जसे
की जुलाब, उलट्या, न्यूमोनिया). आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौद्धिक व मानसिक क्षमता अधिक असते. भावी आयुष्यात स्थूलता, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या रोगांपासून संरक्षण मिळते.
बालमृत्यू व आजाराचे प्रमाण कमी होते. स्तनपानाचे फायदे हे केवळ बाळासाठी मर्यादित नसून स्तनपान केल्याने आईलासुद्धा फायदा होतो. मातेला मिळणारे फायदे स्तपानामुळे मातेचे गर्भाशय पूर्व स्थितीत येण्यास मदत होते. गर्भधारणा टाळण्यास मदत होते. मातेचा बांधा सुडौल होण्यास मदत होते. प्रसूतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो. गर्भाशयाचा तसेच अंडाशयाचा कर्करोग टाळता येतो. आर्थिकदृष्ट्या बचत होते. शिवाय स्तनपान केल्याने बाळ वारंवार आजारी पडत नाही. त्यामुळे बाळाच्या औषधावरील खर्च वाचतो. पहिले सहा महिने केवळ मातेचे दूध द्यावे. मातेच्या दुधात पाण्याचे प्रमाण ८८ टक्के असते त्यामुळे बाळाला पहिल्या सहा महिन्यांत पाणीसुद्धा देऊ नये. स्तनपानामुळे आईच्या अंगावर असलेली अनावश्यक मेदवृद्धी कमी होण्यास मदत होते. स्तनपानातून बालक-मातेला आनंद तर मिळतोच; पण त्यातून प्रेमाचे रज्जू घट्ट होतात. नवजात बालकासाठी मातेचे दूध देणे हा उत्तम आरोग्याचा पहिला मंत्र आहे.आईचे दूध, बाळाचे संरक्षण कवच
आईच्या दुधात नवजात शिशूसाठी आवश्यक ती सर्व पोषणमूल्ये असतात. जन्मल्यानंतर पहिल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी आईच्या दुधातील घटक बाळाचे संरक्षण करतात. अंगावरचे दूध पाजल्याने बाळाला विकार उद्भवत नाहीत व त्याचे आरोग्य उत्तम राहते. प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे थोडे दिवस घट्ट स्वरूपातील चिकाचे दूध (कोलोस्ट्रम) येत असते. चीक-दूध कमी येत असले तरी बाळाला ते पुरेसे असते व त्यातूनच बाळाच्या सर्व गरजा भागविल्या जातात. चिकाच्या दुधात जीवनसत्त्व ए व के जास्त प्रमाणात आढळते. त्यात असलेली
रोगप्रतिबंधात्मक द्रव्ये व इतर आवश्यक घटकांमुळे जंतुसंसर्गापासून बाळाचे रक्षण होते. तसेच या दुधात इम्युनोग्लोबिन असतात. बाळाच्या आतड्यांच्या अंत:त्वचेला लिंपण होते व त्यामुळे बाळाच्या रक्ताभिसरणात प्रथिनांचे मोठे कण जात नाही. अशा प्रकारे बाळाला रोगांपासून संरक्षण मिळते.

Web Title: Importance of breastfeeding for child and mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.