मोहाडी येथे महिलांनी  पकडला अवैध मद्यसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:12 AM2018-03-17T01:12:44+5:302018-03-17T01:12:44+5:30

तालुक्यातील मोहाडी गावात दारूबंदी व्हावी यासाठी तीन महिन्यांपासून महिलांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुमारे ३० महिलांनी मोहाडी-पालखेड रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेला ४५०० रुपयांचा मद्यसाठा पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला़

Illegal wines caught by women at Mohali | मोहाडी येथे महिलांनी  पकडला अवैध मद्यसाठा

मोहाडी येथे महिलांनी  पकडला अवैध मद्यसाठा

Next

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी गावात दारूबंदी व्हावी यासाठी तीन महिन्यांपासून महिलांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुमारे ३० महिलांनी मोहाडी-पालखेड रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेला ४५०० रुपयांचा मद्यसाठा पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला़  मोहाडी येथील अवैध व्यवसाय बंद व्हावे यासाठी येथील महिलांनी ग्रामसभेत ठराव केला आहे; मात्र अजूनही अवैध व्यवसाय सर्रास सुरु असल्याने येथील ग्रामपालिका सदस्य सविता पवार, संगीता माळी, मथुरा पवार, सुगंधा चारोस्कर, ताई आहेर, मंजुळा गांगुर्डे, सरला पवार, विजया गांगुर्डे, हिराबाई गांगुर्डे, सुलोचना पवार, अलका गांगुर्डे, चंद्रकला गांगुर्डे, अलका आहेर, रुपाली पवार, शकुंतला कंक, नंदा माळी, शकुंतला चारोस्कर, जानकाबाई निकुळे, भारती माळी, सरला भगरे, जनाबाई चारोस्कर, जनाबाई माळी, सुनीता पवार यांनी पालखेड रोडवरील हॉटेलवर छापा टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी असलेल्या देशीच्या ७०, विदेशी दारूच्या ६ बाटल्या असा एकूण ४५०० रुपयांचा मुद्देमाल पकडला.

Web Title: Illegal wines caught by women at Mohali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.