अमृता फडणवीस यांच्या जागी मी असते तर सडेतोड उत्तर दिले असते, सुषमा अंधारे यांची रामदेवबाबांवर टीका

By संजय पाठक | Published: November 27, 2022 03:28 PM2022-11-27T15:28:15+5:302022-11-27T15:47:23+5:30

Sushma Andhare: महिलांवर सध्या कोणीही काही बोलत आहेत. अमृता फडणवीस यांच्या समोर योगगुरू रामदेव महिलांविषयी अवमानास्पद विधान करतात. मी त्या जागी असते तर तेथेच सडेतोड उत्तर दिले असते, असे शिवसेनेच्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

If I had replaced Amrita Fadnavis, I would have answered Sushma Andhare's criticism like this | अमृता फडणवीस यांच्या जागी मी असते तर सडेतोड उत्तर दिले असते, सुषमा अंधारे यांची रामदेवबाबांवर टीका

अमृता फडणवीस यांच्या जागी मी असते तर सडेतोड उत्तर दिले असते, सुषमा अंधारे यांची रामदेवबाबांवर टीका

googlenewsNext

- संजय पाठक
नाशिक- महिलांवर सध्या कोणीही काही बोलत आहेत. अमृता फडणवीस यांच्या समोर योगगुरू रामदेव महिलांविषयी अवमानास्पद विधान करतात. मी
त्या जागी असते तर तेथेच सडेतोड उत्तर दिले असते, असे शिवसेनेच्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या सुषमा अंधारे यांनी आज  माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासत्ता केंद्रीकरणाच्या मोहामुळे गृहखात्याची आबाळ होत आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहे. त्याबाबत गृहखाते सोयीसोयीची भूमिका घेत आहे. एका महिलेला ताई बाजुला व्हा असे म्हंटले म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि दुसरीकडे सुप्रीया सुळे यांच्याविषयी सर्रास अश्लील भाषेत बेालणाऱ्यांवर कारवाई होत नाही असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला.

 अल्लाह से तो डरो सत्तार भाई!
कामाख्या देवीचे दर्शन टाळून वेगवेगळी कारणे देणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे अभिनय सम्राट आहेत. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका ते
मांडत असतात. मला शक्य असते तर मी त्यांना अभिनयाचे पारीतोषीक दिले असते असे सांगून सुषमा अंधारे यांनी अत्तार हे हिंदुत्ववादासाठी शिवसेना
सेाडून आले परंतु आता त्यांच्या धर्माचे ते पालन करीत आहेत.' अल्लाह से तो डरो सत्तार भाई' असेही त्या म्हणाल्या.

Web Title: If I had replaced Amrita Fadnavis, I would have answered Sushma Andhare's criticism like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.