तर ‘न्यायालय अवमान’ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:22 AM2018-08-20T01:22:07+5:302018-08-20T01:23:44+5:30

यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे़ मंडप उभारणीसह अन्य नियमावलींचे पालन न केल्यास संबंधित मंडळावर ‘कोर्ट आॅफ कंटेम्ट’ अर्थात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

If the 'court contempt' action is taken | तर ‘न्यायालय अवमान’ची कारवाई

तर ‘न्यायालय अवमान’ची कारवाई

Next
ठळक मुद्दे मुंढे यांनी दिला इशारागणेश मंडळांना अटी : नियमभंग करणाऱ्यांवर नजर;

नाशिक : यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे़ मंडप उभारणीसह अन्य नियमावलींचे पालन न केल्यास संबंधित मंडळावर ‘कोर्ट आॅफ कंटेम्ट’ अर्थात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक शहरात गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे, मात्र यंदा ‘श्रीं’च्या उत्सवावर जाचक नियमावलीचे ‘विघ्न’ आले आहे. नाशिक महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासन यांनी मंडप उभारणी, खड्डे खोदणे तसेच डीजेचा वापर करणे यासंदर्भातील अनेक नियम जारी केले आहेत. त्यामुळे परंपरेप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणाºया गणेश मंडळांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१८) गणेश मंडळांच्या बैठकीत नाशिक शहरासाठी स्वतंत्र गणेशोत्सव महामंडळ स्थापन करतानाच प्रशासनाच्या जाचक नियमावलीस कडाडून विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनाने रस्त्यात मंडप बांधू दिले नाही तर खांबांवर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरची नियमावली ही स्थानिक प्रशासनाने तयार केलेली नसून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने नियम तयार केले आहेत. उच्च न्यायालयाने नियमावलीच्या अंमलबजावणीचे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून, राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना याबाबत अवगत केले आहे़
नियमांचा भंग झाल्यास आयुक्तांना अटक करण्यापर्यंत कारवाई होऊ शकते, त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. सदरची नियमावली यापूर्वीदेखील अमलात होती, मात्र त्याचे आता काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. नियमावलीचे पालन करण्याची जबाबदारी केवळ महापालिकेवर नसून पोलीस आयुक्त आणि अन्य शासकीय यंत्रणांवरदेखील त्याचे काटेकोर पालन करण्याचे बंधन आहे. त्यामुळे नियमावलीचा भंग झाल्यास संबंधित मंडळाविरुद्ध कंटेम्ट आॅफ कोर्टची कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़
मंडळांना पर्यायी जागा सुचविल्या
यंदा शहरातील भालेकर मैदान येथे खासगी मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे़ कारण या ठिकाणी सध्या पार्किंगचे काम चालू आहे़ त्यामुळे या ठिकाणी उत्सव साजरा करणाºया मंडळांना पर्यायी जागा सुचविण्यात आल्या आहेत़ गोल्फ क्लबजवळील मैदानावर उत्सव करता येऊ शकतो. सदरची जागा महापालिकेच्या ताब्यात असल्याने कोणाच्या विरोधाचे कारण नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले़ तपोवन येथे अशाप्रकारे उत्सव साजरा करण्याचा एक पर्याय असून तसे केल्यास अभिनव प्रयोग ठरू शकतो, याचाही विचार संबंधित मंडळांनी करावा, असे आवाहनही आयुक्त मुंढे यांनी केले़
पोलिसांनाही आदेश
गणेशोत्सव मंडळांना धार्मिकतेच्या नावाखाली भडकावणाºया वा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाºयांवर पोलिसांची करडी नजर आहे़ या प्रकारचे कृत्य करणाºया काही राजकीय व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर असून, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे़

Web Title: If the 'court contempt' action is taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.