भुजबळ-कोकाटे यांच्यात तासभर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:24 AM2018-06-07T00:24:51+5:302018-06-07T00:24:51+5:30

सिन्नर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ व सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुंबई भेटीत सुमारे तासभर गोपनीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कोकाटे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर काय चर्चा झाली, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

An hour-long discussion between Bhujbal-Kokate | भुजबळ-कोकाटे यांच्यात तासभर चर्चा

भुजबळ-कोकाटे यांच्यात तासभर चर्चा

Next
ठळक मुद्देभेटगाठ : सहमतीच्या राजकारणाचा भुजबळांनी दिला सल्ला

सिन्नर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ व सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुंबई भेटीत सुमारे तासभर गोपनीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कोकाटे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर काय चर्चा झाली, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (दि. ६) बांद्रा येथील एमईटी शिक्षणसंस्थेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. कोकाटे यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक यावेळी उपस्थित होते. कोकाटे व भुजबळ यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. त्यावेळी सर्व कार्यकर्ते बाहेर होते. ‘माणिकराव, आता जिल्ह्याच्या विकासासाठी सहमतीचे राजकारण करावे लागेल. त्यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवावा लागेल. तशी तयारी ठेवावीच लागेल,’ असा सल्ला भुजबळ यांनी कोकाटे यांना दिल्याचे समजते.
यावेळी सुनील नाईक, संतू पाटील, राजेंद्र जगझाप, बंडूनाना भाबड, चंद्रकांत बोडके, योगेश माळी, पांडुरंग वारूंगसे, वाळीबा गुरूकुले, सिन्नर बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, सुनील माळी, विजय झगडे, अनिल शेळके, राजू माळी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेश नवाळे, शशिकांत गाडे, शरद शिंदे, राजेंद्र पोमनर, कैलास झगडे, बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, माजी नगरसेवक बापू गोजरे, युगेन क्षत्रिय, विजय वरंदळ, मंगेश क्षत्रिय, सतीश कोकाटे, नाना खुळे, ज्ञानेश्वर तांबे, प्रा. जयंत महाजन, बाळू भोर, अंबादास भुजबळ, भरत आरोटे, सुनील उगले, लक्ष्मण मंडाले, नगरसेवक राहुल दिवे आदी उपस्थित होते. नाशिक व सिन्नर तालुक्यातून अनेक वाहनांतून शेकडो कार्यकर्ते कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. सर्वांनीच भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.

Web Title: An hour-long discussion between Bhujbal-Kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.