सलग तीन दिवस बँकांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:47 AM2018-11-24T00:47:28+5:302018-11-24T00:47:45+5:30

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यातील बँका गुरुनानक जयंतीनंतर चौथा शनिवारला लागून आलेल्या रविवारमुळे सलग तीन दिवस बंद असल्याने ग्राहकांना शुक्रवारी पहिल्याच दिवशी आर्थिक व्यवहार करताना विविध अडचणींचा सामना करावा लागला.

Holidays for banks for three consecutive days | सलग तीन दिवस बँकांना सुटी

सलग तीन दिवस बँकांना सुटी

Next
ठळक मुद्देग्राहकांची गैरसोय : आर्थिक व्यवहार करताना येणार अनेक अडचणी

नाशिक : महाराष्ट्रासह देशातील काही राज्यातील बँका गुरुनानक जयंतीनंतर चौथा शनिवारला लागून आलेल्या रविवारमुळे सलग तीन दिवस बंद असल्याने ग्राहकांना शुक्रवारी पहिल्याच दिवशी आर्थिक व्यवहार करताना विविध अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ग्राहक आॅनलाइन बँकिंग करीत असले तरी अजूनही रोख व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शहरातील बाजारपेठेवरही बँकांच्या या सुटीचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
ईद-ए-मिलाद या सणानिमित्त बुधवारी (दि. २१) नोव्हेंबरला बँका बंद राहिल्यानंतर गुरुवारीनिमित्त कामकाज झाले, परंतु शुक्रवारपासून पुन्हा तीम दिवस बँका बंद असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. आगामी चार दिवसात आर्थिक चणचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
बँकांच्या सुट्यांचा प्रभाव; उलाढाल ठप्प
बँकांमधील चेकच्या वटनावळीही रखडल्याने घाऊक व्यापारावरही बँकांच्या सुट्ट्यांचा प्रभाव पडल्याने बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले. दरम्यान, बँकांच्या सलग सुट्यांमुळे अनेक ग्राहकांनी गुरुवारीच बँकेची कामे गुरुवारीच उरकून घेण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी केली होती.
शहरात शुक्रवारी (दि.२३) गुरुनानक जयंतीनिमित्त बँका बंद राहिल्या लगेच येणारा शनिवार हा या महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २४ नोव्हेंबरलाही बँकांचे कामकाज बंद राहणार असून, त्यानंतर रविवारची साप्ताहिक सुटी आहे. त्यामुळे काही भागांतील एटीएममध्ये ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. एकापाठोपाठ एक आलेल्या या सुट्यांमुळे शहरातील कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार खोळंबले. रोखीच चालणाºया व्यवहारांनाही त्याचा फटका बसल्याने बाजारपेठेत शांतता दिसून आली.

Web Title: Holidays for banks for three consecutive days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.